Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedजय भीम म्हणणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार बनवावे : उत्तम शेवडे

जय भीम म्हणणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार बनवावे : उत्तम शेवडे

जय भीम म्हणणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार बनवावे : उत्तम शेवडे

जयंत साठे नागपूर जिल्हा प्रतिनिधी: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय व बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविणे हे स्वप्न होते. ते पूर्ण करायचे असेल तर जयभीम म्हणणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याचे सरकार बनवावे असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व बसपा नेते उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.

ते दक्षिण नागपुरातील सम्राट अशोक सामाजीक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माणेवाडा-बेसा रोडवरील मंगलदीप नगरातील आयोजित फुले-आंबेडकर संयुक्त जयंती समारोहात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

भारतीय संविधान व संसद भवन वाचवायचे असेल तर फुले -आंबेडकरी विचारांचे सरकार या देशात बनविले पाहिजे व त्यासाठी जयज्योती-जयभीम म्हणणाऱ्यांनी विचार धारेशी प्रामाणिक राहण्याचा संकल्प करावा असे आवाहनही केले.

याप्रसंगी प्रा के एस पेटकर, सिद्धार्थ गौतम कळमकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंद तंत्रपाळे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खडतकर यांनी तर समापन राजू वालदे यांनी केला. मंचावर डॉ महेश अंबादे, संजय पाटील, विकास वासे, विजय बोरकर, शेखर वंजारी, जनार्दन साळवे, लेखनदास नारनवरे, रमेश निमसरकार प्रामुख्याने उपस्थित होते.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments