25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

वणी नगर परिषद अंतर्गत “स्वनिधी से समृद्धी” 

वणी नगर परिषद अंतर्गत “स्वनिधी से समृद्धी” 

एक दिवसीय शिबिरात केंद्र शासनेच्या योजनेचा लाभ 

सुरेंद्र इखारे वणी –  येथील नगर परिषदेचे  प्रशासक  निखिल धूळधर यांच्या आदेशान्वये, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनात आणि उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद वणी अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत “स्वनिधी से समृद्धी” योजनेच्या माध्यमातून वणी शहरातील पथविक्रेत्यांचे एक दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले .    या शिबिरात  प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत ज्या पथविक्रेत्यांना लाभ मिळालेला आहे अशा सर्व पथविक्रेत्यांचे सामाजिक / आर्थिक सर्वेक्षण करून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना व रूपे कार्ड, इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी आठ योजनांची माहिती सांगून पथविक्रेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची पात्रता तपासण्यात आली. त्याच बरोबर राज्याच्या विविध सामाजिक- आर्थिक कल्याण योजनांची माहिती या शिबिरात सांगण्यात आली.
या शिबिरामध्ये शहरातील सर्व प्रमुख बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना व रूपे कार्ड या महत्वाच्या तीन योजना ह्या वित्त विभाग आणि बँकर्स समितीच्या अखात्यातीत असल्यामुळे शहरातील बँक व्यवस्थापकांनी या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा यावर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून न.प.वणीचे उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी   उपस्थित पथविक्रेत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.  तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून न.प.चे लेखाधिकारी पांडुरंग मांडवकर यांनी “स्वनिधी से समृद्धी” योजनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी एकूण ४५ लाभार्थ्यांचे केंद्र शासनाच्या योजनेत समावेश करण्यात आले. त्याच बरोबर पथविक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वितरण करण्यात आले.  या शिबिराचे प्रास्ताविक  उत्तम हापसे यांनी केले तसेच सूत्र संचालन शहर अभियान व्यवस्थापक अँड.पौर्णिमा शिरभाते यांनी केले  तर आभार मुदाय संघटक विनोद मनवर यांनी मानले . या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शहर स्तर संघ, सर्व वस्ती स्तर संघ आणि सर्व समूह संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News