Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedस्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी " कोयला रोको आंदोलन "  

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ” कोयला रोको आंदोलन ”  

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ” कोयला रोको आंदोलन “              

      आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन 

सुरेंद्र इखारे वणी – येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे  नेते ऍड वामनराव चटप यांचे मार्गदर्शनात विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  केंद्राशी संबधीत असलेल्या उमरेड येथील कोळसा खाणी समोर 1 मे महाराष्ट्र दिनी दुपारी 12 वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ” कोयला रोको आंदोलनाचे ” आयोजन करण्यात आले.                 या आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा खनिजाचे उत्पादन करून वीज/ऊर्जा निर्मितीकरीता देशभर जाणारा कोळसा  उमरेड जवळील कोळसा खाणी समोर “कोयलो रोको आंदोलन ”  करण्याचा निर्णय घेऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून  विदर्भाच्या  स्वातंत्र्यासाठी  एलगाराचे रणशिंग फुंकले आहे . 

      कोळशाचे उत्पादन महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या प्रमाणात म्हणजे 6300 मेगावॅट वीज  तयार होते त्यापैकी विदर्भाला केवळ 2200 मेगावॅट वीजच वापरावयास मिळते तसेच विदर्भात 58% शेतीपंपाचा अनुशेष असून 6 ते 12 तास लोड शेडिंग सहन करावी लागते व प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचे फुफुसाशी संबंधित सर्व आजार विदर्भातील प्रदूषित जिल्ह्यात आहे दिल्ली व हरियाणा येथील हृदयरोग तज्ञांची चमू 4 वर्षाआधी विदर्भात येऊन गेली होती त्यांनी पाच वर्षात प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर देशात सर्वाधिक हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भात मिळतील असे जाहीरपणे सांगितले होते.

            स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई गेल्या 118 वर्षापासून सुरू असून ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या 12 वर्षापासून आंदोलनाची मालिका सुरू ठेवली असून ही आरपारची लढाई समजून तिचा बिगुल वाजवण्याच्या दृष्टीने व 31 डिसेंबर 2023 पूर्वी करू किंवा मरू,जिंकू किंवा मरू या तऱ्हेने ही निकराची लढाई लढून विदर्भ निर्मितीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा निर्धार केला असून 19 डिसेंबर 2022 पासून सुरू आहे .त्यासाठी  जंग हमारी,लढेंगे जितेंगे लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेण्यासाठी कटेंगे मगर हटेंगे नाही असा एल्गार करून आरपारची लढाई करून 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ मिळवून विदर्भातील जनतेच्या स्वाधीन करण्याचा चंग बांधला आहे.

         महाराष्ट्र हे देशातील नंबर 1 चे कर्जबाजारी राज्य असून राज्यावर 6 लाख 60 हजार कोटीचा कर्जाचा डोंगर असून मार्ग,राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदला अदा करण्याकरता राज्य सरकारने एम.एस.आर.डी.सी.ला ६५ हजार कोटी चे कर्ज घेण्यास परवानगी दिलेली असून त्याला थकहमी (जामीन) राज्य सरकारने दिली आहे अप्रत्यक्षपणे हा बोजा राज्याच्या तिजोरीवर असून राज्याची वाटचाल दिवाळखोरी कडे आहे विदर्भातील जनता 100 वर्ष महाराष्ट्रात राहिली व ब्रह्मदेवाला जरी मुख्यमंत्री केले तरी विदर्भातील जनतेचे बरे होणे नाही म्हणून महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून सर्व आंदोलक त्या दिवशी काळ्या पट्ट्या,काळे वस्त्र व काळ्या टोप्या परिधान करून आंदोलनात सहभागी व्हा .

           राज्याच्या वार्षिक महसुली उत्पन्नापेक्षा वर्षभराचा खर्च भागवायला शासनाकडे सरासरी 25 हजार कोटी कमी आहेत व अर्थसंकल्प तुटीचा आहे त्यामुळे राज्यात सरसकट नोकरभरती बंद करून राज्याच्या बेरोजगारीची संख्या 66 लाखाच्या वर असून विदर्भातील बेरोजगारांची संख्या ही 14 लाखांच्या वर आहे व राज्यात अजामीतिला 2 लाख 55 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून प्रशासन कोलमडले आहे परिणामी योजनांची अंमलबजावणी करताना दप्तर दिरंगाई सुरु झालेली आहे म्हणून या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आणि ते म्हणजे “विदर्भाचे स्वतंत्र राज्य” 

              घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारचा व संसदेचा अधिकार आहे त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने केंद्राशी संबंधित कोयला व खनिजाला कोयले रोको आंदोलन करून केंद्राला टाचणी टोचण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विदर्भातील खासदार व केंद्रीय मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गावबंदी घोषित केली आहे विदर्भ राज्य निर्मितीचा घडी हळूहळू जवळ येत असून 31 डिसेंबर पर्यंत तीव्र आंदोलने करून या मागणीला विदर्भ राज्य निर्मिती करून पूर्णविराम देण्याचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितने केला आहे.  “दुखी मन मेरे सुनो मेरा कहना,”जहा नही चैना वहा नही रहना” अशी स्वातंत्र्याची घोषणा केली यावेळी विदर्भाचे नेते नेते ऍड वामनराव चटप प्रा पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,राहुल खारकर,राजू पिंपळकर,बाळासाहेब राजूरकर,नामदेवराव जनेकर,देवा बोबडे,होमदेव कनाके,धीरज भोयर,संजय चिंचोळकर,अनिल टोंगे,मोहन हरडे,काशीनाथ देऊळकर,शशिकांत नक्षीने,दिनेश रायपूरे,विजय बोबडे,रामजी महाकूलकर,पांडुरंग पंडिले,राम मुडे सर,अशोक चौधरी,नीलिमा काळे,कलावती क्षीरसागर,नारायण मांडवकर,सुभाष वैद्य,प्रभाकर उईके,योगेश बेलेकर,सिद्धार्थ ताकसांडे इत्यादी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments