25 C
New York
Saturday, July 13, 2024

जागतिक पुस्तक दिनानिमित्त नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

जागतिक पुस्तक दिनानिमित्त नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

सुरेंद्र इखारे वणी    :-   जागतिक पुस्तक दिनानिमित्त येथील नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन दि. 23 एप्रिलला करण्यात आले. या प्रदशनीचे उदघाटन येथील सनदी लेखापाल (C A ) अनिल झाबक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री मीनाक्षी गोरंटीवार या होत्या.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना झाबक म्हणाले की, पुस्तकांशी मैत्री केल्यामुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला. प्रत्येकांनी पुस्तकावर प्रेम केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. मीनाक्षी गोरंटीवार यांनी लोप पावत असलेल्या वाचन संस्कृती विषयी चिंता व्यक्त करून वाचाल तर वाचाल असा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषण करतांना माधवराव सरपटवार यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनालायतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रत्येकांनी एका महिन्यात किमान एक तरी पुस्तक वाचावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी मीनाक्षी गोरंटीवार व स्मिता गोरंटीवार यांनी त्यांच्या प्रकाशित कवितांचा संग्रहाचे संच वाचनालयाला भेट स्वरूपात दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक अनिल जयस्वाल यांनी केले. या प्रसंगी हरिहर भागवत, अर्जुन उरकुडे, राजाभाऊ पाथ्रडकर, अशोक सोनटक्के, लक्ष्मण इड्डे, राजेश महाकुलकर, प्रवीण शर्मा, गजानन भगत, शैलेश अडपावार सह युवा वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी वाचनालयाचे प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News