वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनलच्या दिशेने
चार केंद्रावर मतदान; मतदारांचा कल
सुरेंद्र इखारे वणी :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक 2023-28 या वर्षकरिता होऊ घातली आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील नामवंत व मोठी समजली जाणाऱ्या बाजार समितीच्या 18 संचालकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार केंद्रावर 28 एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत ” शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उभे ठाकले असल्याने मतदारांचा कल परिवर्तनाच्या दिशेने दिसून येत आहे. कारण महाराष्ट्र राज्यात फुटाफुटीचे धोरण पाहता याचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर होताना दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत ” शेतकरी परिवर्तन पॅनलचे ” नेतृत्व काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकार यांच्या मार्गदर्शनात असून संपूर्ण पक्षातील पदाधिकारी ,सदस्य, कार्यकर्ता हा “शेतकरी पॅनलला ” निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेतकऱ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाचा आराखडा ठेवून मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मतदारांचा कल यावेळी महाविकास आघाडीच्या ” शेतकरी परिवर्तन पॅनलकडे” आहे. तेव्हा महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून डॉ मोरेश्वर पावडे, गणपत रासेकर, अरुण ताजने, अतुल काकडे, प्रसाद ठाकरे, नरेंद्र बदखल, पंढरी राजूरकर, इतर मागास वर्गातून प्रमोद वासेकर, विमुक्त भटक्या गटातून प्रवीण वैद्य, महिला गटातून शीतल बोबडे, गीता उपरे,ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून विजय ठाकरे, धीरज डाहूले, अनुसूचित जाती जमाती गटातून मंगल मडावी, आर्थिक दुर्बल गटातून गजानन खिरटकार, व्यापारी अडते मतदारसंघातून सतीश बडघरे, रवींद्र कोंगरे, हमाल मापारी मतदारसंघातून प्रमोद सोनटक्के हे सर्व 18 उमेदवार “विमान” या चिन्हावर संचालकपदासाठी उभे आहेत. या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचून परिवर्तनाची मागणी केली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत परिवर्तन करणार असल्याचे मतदारातून बोलल्या जात आहे. त्यामुळे मतदारांचा कल परिवर्तनाचे दिशेने दिसून येत आहे.