ओव्हरलोड वाहतूक व गतिरोधक देण्यासाठी कायर ग्रामवासीयांचा रास्तारोको
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक नियंत्रित करणे व चौपाटीवर गतिरोधक देण्यासाठी कायर ग्रामपंचायत सरपंच नागेश धनकसार व समस्त ग्रामवासीयांचे वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कायर येथील मुकुटबन वणी राज्य मार्गावरून अखंड ओव्हरलोड वाहतूक नियमितपणे सुरू आहे . कायर हे गाव राज्यमार्गावर असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत आहे हे गाव परिसरातील 20 ते 25 गावांची मुख्य बाजारपेठ आहे दर गुरुवारला ऐतिहासिक बैलबाजार भरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . तसेच कायर येथे नर्सरी ते महाविद्यालयीन शिक्षण असल्याने बाहेर गावावरून विद्यार्थी ये जा करतात मुख्य रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रुग्णांची ये जा चालू असते त्यामुळे येथील ओव्हरलोड हायवा, मोठे ट्रक अनियंत्रित पणे चालत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा ही वाहतूक रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक करण्याची तसेच या राज्यमार्गावर गतिरोधक देण्यात यावे या मागण्या घेऊन रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश धनकसार यांनी केले. तब्बल दीड तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनकर्त्यांना संबधीत अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेतले या आंदोलनात सरपंच नागेश धनकसार व संपुर्ण ग्रामवासी सहभागी झाले होते.