23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाच्या शेतकरी एकता पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले

वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाच्या शेतकरी एकता पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले

सुरेंद्र इखारे वणी :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी मतदान करून आज झालेल्या मतमोजणीत विरोधकांचा धुव्वा उडवून शेतकरी एकता पॅनलचे 14 संचालक विजयी झाले आहे. या निवडणुकीत भाजपा व शिंदे शिवसेना गटाने आपले उमेदवार विरोधकांच्या समोर उभे ठाकले होते या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिंदे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख विनोद मोहितकर , सोसायट्या वर वर्चस्व असलेले विनायक एकरे यांचे नेतृत्वात विरोधकांचा धुव्वा उडवून 14 संचालक विजयी केले यासाठी भाजप व शिंदे गटाचे सदस्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजय मिळविला आहे . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 1855 सभासद मतदारापैकी 1744 मतदारांनी मतदान केले असून 94 टक्के मतदान झाल्याने दोन्ही पॅनेलमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असताना मतदारांनी मात्र भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी एकता पॅनलने विजय खेचून आणला वणी तालुक्यात चुरशीची समजली जाणारी निवडणूक एकास एक असताना एकतर्फी झाली त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडवून दणदणीत विजय मिळवित वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले .मात्र विरोधकांना चार संचालकांवर समाधान मानावे लागले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News