नृसिंह व्यायाम शाळेत महाराष्ट्र दिन साजरा
मान्यवरांचे हस्ते प्रशिक्षकांचा सत्कार
मैदानी खेळाचे आयोजन
बंडू निंदेकर :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवार ला सकाळी 8.00 वाजता केजी टू पिजी निवृत्त शिक्षक संघटना वणी यांच्या तर्फे नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणात श्री अंबादास कुटे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य महादेव घागी , नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, बी,एन ढोके . गणपत पारखी .पांडुरंग ताटेवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग ताटेवार यांनी केले यावेळी परीसरातील गणमान्य नागरिक व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते
तर सायंकाळी 4 .00 वाजता नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणात मैदानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. यात जवळपास 50 ते 60 मुलामुलींनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मुलांनी सादर केलेल्या प्रत्यक्षिकात प्रामुख्याने लाठीकाठी, दांडपट्टा,चक्र,बणलाठी यांसारख्ये आत्मरक्षणाचे प्रकार दाखविण्यात आले यासाठी प्रशिक्षक तेजस्विनी राजु गव्हाने हिने या विद्यार्थ्यांवर परीश्रम घेतले चिमुकल्यानी केलेले मैदानी प्रात्यक्षिक बघून मान्यवर अचंबित होऊन त्यांचे कौतुक केले व या कौतुकाची थाप म्हणून काहींना काही देण्याचे घोषित केले . व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले यांनी मुलांमुलींना मैदानी खेळाचे मोफत प्रशिक्षण द्यायची घोषणा केली,लोढा हाॅस्पीटल तर्फे मोफत वैद्यकीय सेवा देण्याची घोषणा केली, मान्यवरा तर्फे तेजस्विनी व वडील राजु व आजोबा देवरावजी गव्हाने सत्कार करण्यात आला
याप्रसंगी माहात्मा जोतिबा फुले पुरस्कार विजेते श्रिमती रानानुर सिद्दीकी.सौ किरण देरकर सौ स़ंद्या रामगिरवार सौ सुमित्रा गोडे. सौ.वैशाली तायडे.डॉ.महे़द्र लोढा.ऍड.निलेश चौधरी.युवक काॅ. चे माजी अध्यक्ष ओम ठाकुर. शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुरे.अवी भुजबळराव.क्रांती युवा संघटनेचे राकेश खुराणा.श्री.पवार साहेब पोलीस निरीक्षक, यवतमाळ.शेखर वांढरे सहायक उपनिरीक्षक .अजय ढोणे सहायक उपनिरीक्षक.प्रा.रोहीत वनकर.व्यायाम शाळेचे सचिव पुरुषोत्तम आक्केवार.दादा राऊत.बंडु निंदेकर.दिलीप येमुलवार.यासह शहरातील नागरिक. विद्यार्थी पालक मोठ्या संखेने उपस्थित होते