23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

लाठी येथील बालक पियुष माहुरे शेतातील विद्युत तारेच्या करंट ने जखमी 

लाठी येथील बालक पियुष माहुरे शेतातील विद्युत तारेच्या करंट ने जखमी   

खाजगी रुग्णालयात उपचार सुरू       

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी       

  सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यातील लाठी येथील पियुष संभाषिव माहुरे वय 9 वर्ष असलेला बालक गावातील मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गावालगतच्या शेतात दिनांक 2 मे 2023 ला दुपारी 2.00 वाजताचे दरम्यान गेला होता . त्या शेतात पडून असलेल्या विद्युत तारेचा करंट लागून हात पाय भाजल्याने  तो जखमी होऊन निपचित पडला होता.        अंदाजे दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान क्रिकेट खेळणारी मुले धावत धावत गावाकडे पळ काढला व त्यांनी गावातील शेतमालकाला सांगितले आपल्या शेतातील विद्युत तारा खाली पडून पियुष माहुरे याच्या हाताला व पायाला करंट लागल्याने तो जखमी होऊन शेतात निपचित पडून आहे. असे कळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली व जमिनीवर पडलेल्या पियुषला उचलून गावकऱ्यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व तेथे प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात भरती केले.परंतु  या घटनेपूर्वीच दिनांक 1 मे 2023 रोजी शेतमालकाने शेतात पडून असलेल्या विद्युत तारांची माहिती गावातील लाईनमन राजू पावडे याना देण्यात आली होती परंतु त्या लाईनमन ने कोणतीही कार्यवाही न करता त्याकडे दुर्लक्ष केल्याने या घटनेला म रा वि महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप करत पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे .यावेळी गणेश माहुरे, नंदकिशोर माहुरे, राहुल खारकर, आशिष माहुरे व गावकरी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News