वणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न
सुरेंद्र इखारे वणी – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त एस बी लॉन येथे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा राजेंद्रपल गौतम माजी मंत्री दिल्ली सरकार हे होते . प्रमुख पाहुणे मा प्रा डॉ इसादास भडके आंबेडकर विचारवंत ,चंद्रपूर, मा प्रा डॉ सागर जाधव ” वामनदादा कर्डक” साहित्याचे अभ्यासक यवतमाळ , विचारमंचाचे सल्लागार प्रा पुरुषोत्तम पाटील, माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण सोनारखन ,माजी मुख्याध्यापक दिगंबर पुनवटकर , विचारमंचाचे अध्यक्ष गौतम तेलंग उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत चंदन तेलंग यांच्या चमूने ” स्वागतम सुस्वागतम ” या गीताने केले . त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे विचारमंचाचे वतीने पुष्पगुच्छ , मोमेंट शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मनस्वी घनमोडे या चिमुकलीने क्रांतीसूर्य ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले.यावेळी कु हर्षद खेकारे व समैदा चिकाटे ,आकांशा तामगाडगे, सुमित रामटेके, प्रशिक भगत, तसेच जयंत साठे सर व प्रशांत खैरे सर याचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तेलंग यांनी केले . मान्यवराचा परिचय ठमके मॅडम यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, व समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.