23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

ढुमे नगरच्या बगीचा मागील रस्ता मोकळा करून देण्याची मागणी    

ढुमे नगरच्या बगीचा मागील रस्ता मोकळा करून देण्याची मागणी        

* मुजोरीने रस्त्यावर अतिक्रम * *रहिवाश्यात असंतोष *

स्थानिक आमदार ,प्रशासन हतबल* न्याय मागायचा कोणाला?        

सुरेंद्र इखारे वणी –   येथील दुमे नगर मधील बगीच्याचे बांधकाम सुरू असल्याने त्या बगीच्या मागील रहिवाश्यांची घरे असल्याने उत्तर दक्षिण जाण्या- येण्यासाठी रस्ता आहे परंतु अतिक्रमण धारकांनी मुजोरीने जाण्या- येण्याचा मार्ग बंद केल्याने घरा बाहेर कसे पडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा मुख्याधिकारी व प्रशासकाने रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी गुरूनगर रहिवाशी विठ्ठल जळेकर व मधुकर घुगुल यांनी केली आहे.      दुमे नगर मधील बगीच्याचे बांधकाम सुरू असून त्या बगीच्या मागील पूर्वेला घरे आहे. त्या घरांना जाण्या- येण्याकरिता उत्तर – दक्षिण साडेचार फुट रुंदीची गल्ली रहदारी करण्याकरिता स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , मुख्याधिकारी अभिजित वायकोस, नगरसेवक राजू भोंगळे व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असताना अतिक्रमण धारक मासिरकर यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे कबूल केले असताना सुध्दा अतिक्रमण काढले नाही त्यामुळे येण्या जाण्याचा मार्ग बंद असल्याने न्याय मागायचा कुणाला असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.    वास्तविक पाहता फर्निचर मार्ट यांचे दुकानापासून ते वरोरा रोड पर्यंत 10 फूट रुंद असलेला येण्या जाण्याचा रस्ता आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिला होता त्यावेळी आदेशाचे पालन करीत मुख्याधिकारी जळक यांनी अतिक्रमण काढले . पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशी हतबल झाला आहे. तेव्हा स्थानिक आमदार ,शासन ,मुख्याधिकारी व प्रशासकाने गांभीर्याने दखल घेऊन  रस्ता अतिक्रमनातून मुक्त करून जाण्या – येण्यासाठी मार्ग द्यावा अशी मागणी विठ्ठल जळेकर व मधुकर घुगुल यांनी केली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News