छत्रपती शाहू महाराज स्मारकासाठी बसपाचे धरणे
मेडिकल चौक जाम
नागपूर जयंत साठे:- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा मेडिकल चौकात पुतळा व स्मारक बनवावे या 23 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी आज बसपाने मेडिकल चौक जाम केला. छत्रपती शाहूंच्या 101 व्या स्मृतिदिना निमित्ताने मेडिकल चौकात आज बसपाने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिदिन समारंभाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव रंजनाताई ढोरे, इंजि राजीव भांगे, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, नागपूर शहराध्यक्ष सादाब खान, शहर प्रभारी विकास नारायणे, जिल्हा सचिव अभीलेश वाहाने, संजय ईखार यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.
छत्रपती शाहू यांनी 26 जुलै 1902 रोजी मागास वर्गीयांना (85%) नोकरी व शिक्षणात 50 टक्के आरक्षणा ची सुरुवात केल्याने त्यांना आरक्षणाचे जनक म्हटल्या जाते. यांनी जुलै 1917 ला आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे केले होते. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र विभाग सुद्धा सुरू केला होता. एवढेच नव्हे तर अस्पृश्य विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य सुद्धा देण्याचा कायदा केला होता.
संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत 1920 ला ते स्वतः अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेसाठी नागपुरात येऊन गेले. अशा लोक राज्याचा पुतळा नागपूर सारख्या महानगरात बसवण्यात यावा, ही मागणी बसपा ने 2002 ला केली होती. त्याला एक मताने मनपाने मंजुरी सुद्धा दिली. मेडिकल चौकात त्याची जागा सुद्धा निश्चित करण्यात आली. मनपा ने स्मारकासाठी बजेट सुद्धा ठेवले, परंतु अजून पर्यंत त्या स्मारकाला मूर्त रूप आले नाही, म्हणून बसपाने काँग्रेस-राका, भाजप- सेना शासनाचा निषेध करत “शाहू महाराजांचा पुतळा मेडिकल चौकात बसलाच पाहिजे, शाहू महाराजांचे स्मारक बनलेच पाहिजे” आदि घोषणा देत देत बसपा कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांचे भव्य कट आउट व पक्षध्वज घेऊन काही कालावधी करता मेडिकल चौक जाम केला.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखाताई डोंगरे, पूर्व नागपूरचे अध्यक्ष धर्मपाल गोंगले, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे नितीन वंजारी, महीपाल सांगोळे, शंकर थूल, वाडीचे वीरेंद्र कापसे, अंकित थुल, अनिल मेश्राम, भानुदास ढोरे, विनोद सहाकाटे, वासुदेव मेश्राम, हेमंत बोरकर, मिलिंद वारके, दिनेश लेंडे, संभाजी लोखंडे, श्रीकांत लिहितकर, श्रीकांत हाडके, संबोधित सांगोळे, सुभाष सुखदेवे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तर कार्यक्रमाचा समारोप युवा नेते सुरेंद्र डोंगरे यांनी केला.