” वणी 24 न्यूज ” संपादकीय – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या “स्मृती शताब्दी वर्षपूर्ती” निमित्त कृतज्ञता …
जयंत साठे नागपूर – राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम समाजातील दरी दूर व्हावी यासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी आरक्षणाचा आदेश काढला व त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांनी अठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.त्यांनी दिलेला आदेश पुढीलप्रमाणे होता – …महाराज सरकार असा हुकूम करतात की, हा हुकूम पोहोचलेल्या तारखेपासून रिक्त झालेल्या जागांपैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा ५० पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी. या हुकमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वतोपरी मदत करणारे तसेच बहुजन समाजात शैक्षणिक सामाजिक आर्थिक भान निर्माण करणारा रयतेचा बहुजन सत्यशोधक राजाला विनम्र अभिवादन..
💐💐🙏🙏