23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

विदर्भातील वणीच्या भूमीत सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रबोधनकार प्रा ज्ञानदेव काशिद यांचे जाहीर व्याख्यान 

विदर्भातील वणीच्या भूमीत सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रबोधनकार प्रा ज्ञानदेव काशिद यांचे जाहीर व्याख्यान                 

सुरेंद्र इखारे वणी –    31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांची 298 वि जयंती निमित्ताने विदर्भातील वणीच्या भूमीत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा ज्ञानदेव काशिद ,बीड यांचे   “राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य व ओबीसी जातनिहाय जनगणना राष्ट्रहितासाठी काळाची गरज! या विषयावर जाहीर व्याख्यान .                         प्रा ज्ञानदेव काशिद, बीड येथील  सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रबोधनकार त्यांचा सविस्तर माहिती पट  प्रा ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्य आणि विचारावर आधारित त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे. उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.युवकांचे प्रबोधन कार्याचा वारसा पुढे चालवला आहे. तसेच बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.तसेच त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जसे, शब्दरत्न पुरस्कार, राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार, राजे संभाजी गौरव पुरस्कर ,मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक

, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके मिळाली असून त्यांचे व्याख्यान व समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे . तेव्हा अश्या या व्याख्यात्याला एकण्याकरिता सर्व समाजबांधवांनी शिवतीर्थ परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी येथे उपस्थित राहून जाहीर व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा संजय लव्हाळे, उपाध्यक्ष वसंत गोरे, सचिव रघुनाथ कांडरकार, सहसचिव आशिष साबरे, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र इखारे, सूर्यभान चिडे, नितीन वैद्य, अनिकेत चामाटे, गुरुदेव चिडे, अतुल बोबडे, प्रदीप बोरकुटे, नारायण मांडवकर, सुरेश मांडवकर, महेश लिपटे, संजय चिंचोळकर, राजेंद्र देवडे, रवींद्र आंबतकर, प्रा आनंद बन्सोड, प्रा राम मुडे, सौ लोपामुद्रा आस्कर तथा समस्त धनगर समाज ,वणी,मारेगाव व झरी यांनी केले आहे.

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News