23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

सार्थकने ‘अव्वल स्थान मिळविले….!

 

सार्थकने ‘अव्वल स्थान मिळविले….!

मॅकरुन शाळेची 100% निकालाची परंपरा कायम

सवणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी शाळेने यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. यात दहावीत सार्थक वरारकर याने 97.60 टक्के गुण प्राप्त करत अव्वल येण्याचा मान पटकावला.

नुकताच केंद्रीय शिक्षण मंडळाने दि. 12 मे ला दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यामध्ये स्टुडंट्स अकॅडमी शाळेचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.संबंधित परिस्थिती लक्षात घेऊन सी.बी.एस ई. नी आखुन दिलेल्या नियमानुसार मॅकरुन स्टुडन्टस अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी ची 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.आणि 90% पेक्षाही अधिक गुण मिळवून भरघोस यश संपादन केले आहे.असे अतुल्य यश मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या व आपल्या पालकांच्या सन्मानात मोलाची भर घातली आहे.ह्यात ……विद्यार्थ्यांची नावे सार्थक वरारकर 97.6% डींकी शुगवानी 95.2%,सक्षम साहू 94.6% योगेश पिंपळकर 95%, विवेक खिरटकर 95%आर्या काटकर 94.4% रफिया रहमान 94.8% अनघा बोढे 94.6% अदिती येवले 94.8 %आदित्य माहुरे 94.6 % वंश ठाकरे 94.4% शर्वरी बोढके 94.3% या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
मॅकरुन स्टुडंन्टस अकादमीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आणि इथला प्रत्येक विद्यार्थी या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक पी.एस.आंबटकर सर, उपसंचालक पियूष आंबटकर, प्राचार्या शोभना मॅम तसेच शाळेतील शिक्षकांना दिले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News