*वणीची आर्या चौधरी यवतमाळ जिल्ह्यामधून दुसरी तर वणी तालुक्यातून पहिली*
सुरेंद्र इखारे वणी :- सी. बी. एस. सी. बोर्डच्या इयत्ता 10 वी मध्ये 500 पैकी 491 (98.20 %) गुण घेऊन आर्या मनीष चौधरी, रा. रवी नगर वणी ही यवतमाळ जिल्ह्यामधून दुसरी आणि वणी, मारेगाव, झरी तालुक्यातून पहिली आली आहे.
विशेषतः तिला हिंदी, गणित आणि आय. टी. विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले असून इंग्रजी विषयात 97, विज्ञान विषयात 95 तर सोशल सायन्स विषयात 99 गुण मिळाले आहे. फक्त एका मार्काने तिचा पहिला क्रमाकं हुकला आहे. आय. टी हा विषय येच्छिक होता त्याचे गुण विचारात घेतले तर आर्या हिला 600 पैकी 591 (98.50 %) गुण मिळाले आहे.
आर्या ही अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल वणी ची विद्यार्थिनी आहे, तिचे खूप खूप अभिनंदन.
ती तिचे यशाचे श्रेय तिचे आई-वडील,काका व काकू, शाळेचे संचालक श्री नरेंद्र रेड्डी सर, मुख्याध्यापिका सौ. सोजन्या मॅम, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि श्री. लोया सर यांना देत आहे.