25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

डॉ. धनराज डहाट यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार

डॉ. धनराज डहाट यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार                       

जयंत साठे नागपूर  – :     विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारंभ अमरावती येथे विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्या हस्ते ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक व विचारवंत डॉक्टर धनराज डहाट यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावतीच्या सामूहिक अभिनंदन सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. एकता रॅली आयोजन समितीचे मुख्य संयोजक समाज भूषण राजूजी ननावरे यांनी यासाठी परिश्रम घेतले आहे. धनराज डहाट प्रख्यात लेखक असून त्यांची लिहिलेली आतापर्यंत 60 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून आंबेडकरी व इतर समाजामध्ये समाज प्रबोधनाचे ऐतिहासिक कार्य होत आहेत. त्यांची काही पुस्तके हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. आतापर्यंत ते जवळपास पाच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व उद्घाटक राहिलेले आहेत.याच महिन्यात जळगाव येथे झालेल्या तिसरे बौद्ध साहित्य संमेलनात त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल अनेक संघटनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News