25 C
New York
Saturday, July 13, 2024

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रशासनातर्फे नकोडा-मुंगोली पुलाची पाहणी

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रशासनातर्फे नकोडा-मुंगोली पुलाची पाहणी

माजी जि. प. सदस्य विजय पिदूरकर यांच्या मागणीला यश

सुरेंद्र इखारे वणी –   ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे सा. बां. वी. चे कार्यकारी अभियंता यांना वर्धा नदीच्या नकोडा-मुंगोली पुलाची मंगळवार, १६ मे रोजी सकाळी १० वाजता पाहणी करण्यासाठी पत्र मिळाले.

त्याअनुषंगाने यवतमाळ माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, चंद्रपूर माजी जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, चंद्रपूर सा. बां. वि. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, उप अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, वेकोलि मुंगोली उपक्षेत्रीय प्रबंधक हनुमंत साळुंखे, वेकोलि स्थापत्य अभियंता श्रीमीना, साखरा सरपंच निलेश पिंपळकर, कोलगाव सरपंच गणेश जेनेकर, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य रजत तुराणकर, ऋषी कोवे, माथोली सरपंच ज्योती माथुलकर, चिंचोली सरपंच शालिनी सलामे, शिवणी ग्रा. पं. सदस्य विश्वास बोरपे, साखरा ग्रा. पं. सदस्य निखिल उपासे, माथोली ग्रा. पं. सदस्य कुणाल डोहे, मुंगोली ग्रा. पं. सदस्य जिवन अतकारे, मुंगोली माजी उपसरपंच गणेश रोडे, माथोली माजी सरपंच सुधाकर बोबडे यांनी संयुक्तरित्या वर्धा नदीच्या नकोडा-मुंगोली पुलाची पाहणी केली. पाहणी दरम्यान हा पुल पायदळ व दुचाकी वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले तसेच निरीक्षण करून लवकरच पायदळ व दुचाकी वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहे.

मौजा मुंगोली जिल्हा यवतमाळ ते नकोडा चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा जडवाहतुकीस प्रतिबंधित पुलाचे निरीक्षण करून पदाचारी व दुचाकी वाहतुकीस परवानगी देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी वेकोलि महाप्रबंध यांना पत्र दिले आहे.

यवतमाळचे माजी जि. प. सदस्य विजय पिदूरकर यांनी वर्धा नदीच्या नकोडा-मुंगोली पुलाचे निरीक्षण करून पदाचारी व दुचाकी वाहतुकीस परवानगी देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे निवेदनातून पाठपुरावा केला.
मुंगोली व १५ गावांचा संपर्क घुग्घुस या औद्योगिक शहराशी आहे. क्षतिग्रस्त झाल्याने काही महिन्यापासून नकोडा- मुंगोली पुल हा वाहतुकीसाठी वेकोलिने बंद केला आहे. त्यामुळे वेकोलिचे कामगार, मुंगोली परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी व नागरिकांचे घुग्घुसकडे ये-जा करणे बंद झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे नागरिकांना बाजार पेठ, वैद्यकीय सुविधे साठीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच वेकोलि कामगारांना ये जा करण्यासाठी मोठया अडचणीचा सामना करावा लागत आहे. जवळपास ४० किमी अंतराचा फेरा पार करून मुंगोली-घुग्घुस असा प्रवास करावा लागत आहे.

त्याअनुषंगाने माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर यांनी निवेदनातून मागणी केली होती.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News