वणीच्या बाजार समितीचे सभापती किंवा उपसभापतीपदी महिलांची वर्णी लागण्याची शक्यता
जनसामान्यांत चर्चा ; मात्र निष्ठावंत संचालकांची वर्णी
सुरेंद्र इखारे वणी – वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 14 संचालकामध्ये दोन महिला व बारा पुरुष विजयी झाले आहे . त्यामुळे सभापती पदी किंवा उपसभापती पदी एका महिला संचालकांला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही . परंपरेनुसार 8-10 दिवसात सभापती व उपसभापतीची निवड होण्याची शक्यता आहे. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच आटोपली निकालही जाहीर झाले असून मतदारांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता दिली आहे. मात्र सभापती व उपसभापतीपदी कोणाची निवड करायची हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती पदाच्या निवडीबाबत औसूक्य निर्माण झाले आहे. चुरशीची समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपा व शिंदे सेना गटाच्या शेतकरी एकता पॅनलचे नेतृत्व विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले त्यांच्या या नेतृत्वात विरोधकांचा धुव्वा उडवून एकतर्फी विजय मिळवला आहे त्यामुळे . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीत बाबत संचालकासोबत चर्चा करून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार महिला किंवा पुरुष संचालकांची निवड करणार आहे. अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अजूनपर्यंत महिला सभापतींचा मान मिळाला नाही. तेव्हा शासनाने महिलांना आरक्षण दिल्याने आता सर्वक्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती किंवा उपसभापतीपदी महिलांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही यामध्ये मीरा पोतराजे व वैशाली राजूरकर या दोनच महिलापैकी एका ला लॉटरी लागण्याची शक्यता आहे .त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती किंवा उपसभापतीपदी निवड करून भारतीय जनता पक्ष एक नवीन पायंडा पाडून महिलांना संधी देणार असल्याचे चर्चा जनसामान्यांत दिसून येत आहे. मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत संचालकांचीच वर्णी लागणार एवढे मात्र निश्चित . यात वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.