भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शिष्यवृत्ती व समान संधी केंद्राबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे राज्यभर आयोजन
नागपूर जयंत साठे:
शैक्षणिक कार्य हे आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना शिक्षणाचा लाभ घेता यावा याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात अनेक प्रकारचे गट आहे त्या गटातील लोकांसाठी समाज कल्याण विभाग वेगवेगळ्या योजना राबवित असतात त्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आवश्यक असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. संपूर्ण भारतातून सर्वात जास्त समान संधी केंद्राची स्थापना एका वर्षात महाराष्ट्रात झाली असल्याचे डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सांगितले.
समाजातील सर्व तळागाळातील लोकांपर्यंत समाज कल्याण विभागाच्या योजना पोहोचाव्यात याकरीता डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शिष्यवृत्ती व समान संधी केंद्राबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे. सदर कार्याशाळेचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडीटोरियम सभागृह, दीक्षाभूमी नागपूर येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक तथा अध्यक्ष म्हणून डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे होते. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिक्षण घेतांना कोणत्याही अडचणी येऊ नये. शिष्यवृत्ती, स्वाधार योजना किंवा अन्य काही शिक्षणासंबंधी अडचणी असल्यास त्याचे निरासन तथा मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून समाज संधी केंद्राची स्थापन करण्यात आली आहे. समान संधी केंद्रात प्रत्येक महापुरुषांच्या जयंती वा पुण्यतिथीचे कार्यक्रम कोणताही भेदभाव न करता करण्यात यावे. तेथे एकोपा असणे आयश्यक आहे. कोणते शिक्षण घ्यावे, नोकरीच्या संधी कुठे असतील, जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज कसे भरावे किंवा अन्य काही शैक्षणिक समस्या याविषयीची संपुर्ण माहिती समान संधी केंद्राद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे याकरीता विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक यांची नियुक्ती तेथे असणे गरजेचे असल्याचे मा. आयुक्त महोदयांनी यावेळी दिली. पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात कशाप्रकारे जमा होते याबद्दलची माहिती तसेच सर्वांची समान संधी केंद्राचे सदस्य होऊन त्याची धुरा आपल्या हातात घ्यावी. आपले भविष्य आपल्या हातात घेतली तरच आपली प्रगती होते असे आवाहन यावेळी मा. आयुक्त महोदयांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले. या कार्यशाळेला नागपूर जिल्ह्यातून सुरुवात होत असून संपूर्ण विभागात ही कार्यशाळा होणार आहे अशाप्रकारे संपूर्ण राज्यभर ही कार्यशाळा होणार असल्याचे त्यंनी सांगितले. डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सामाजिक न्याय पर्व उपक्रम राबविण्यात आला. याचप्रकारे 1 मे 2022 ला सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर, समता पर्व असे अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. मा. आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेचे आयोजन राज्यभर करण्यात आले असल्याचे यावेळी प्रादेशिक उपायुक्त यांनी सांगितले.
कार्यशाळेत लाभार्थ्यांना स्वाधार योजनेचे सन्मानपत्र देण्यात आले. तसेच रु. एक कोटी पहिला हप्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस द्वारे श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांच्या नेतृत्वात जमा करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. आढे, तर आभार प्रदर्शन श्रीमती अंजली चिवंडे, विशेष अधिकारी (शासकीय निवासी शाळा) यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर व त्यांचे कार्यालयातील श्रीमती निलीमा मून, श्री. प्रशांत वासनिक, श्रीमती पेंदाम, श्रीमती गिते, श्रीमती कोडापे, श्रीमती मेश्राम, श्री. दिवाकर बदन श्री. सुशिल शिंदे, निलेश बोबडे, श्रीमती प्रिती नुन्हारे, विजय वाकोडीकर, राजेंद्र अवधूत, सुयोग पडोळे, जितेंद्र सातपुते इ. सर्व अधिकारी व कर्मचारी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांनी प्रयत्न केले.