25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

वणीतील “मैकरुन स्टुडंट अकैडमी” कडून चक्क शासनाच्या अधिसूचनेला डावलून विद्यार्थी पालकांची होत असलेली आर्थिक लुट थांबविण्याची मागणी !

वणीतील “मैकरुन स्टुडंट अकैडमी” कडून चक्क शासनाच्या अधिसूचनेला डावलून विद्यार्थी पालकांची होत असलेली आर्थिक लुट थांबविण्याची मागणी !

शिक्षण विभाग, पंचायत समिती, वणीचा चौकशी अहवाल संशयाच्या भोव-यात.

मैकरुन शाळेकडून शासन योजनेचा फज्जा.

सुरेंद्र इखारे वणी – वणीतील प्रतिष्ठीत समजल्या जाणा-या “मैकरुन स्टूडेंट अकैडमी” कडून चक्क शासनाच्या अधिसूचनेला डावलून विद्यार्थी पालकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
वणीतील “मैकरुन स्टूडेंट अकैडमी” या प्रतिष्ठीत समजल्या जाणा-या शाळेत सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) योजने” अंतर्गत कु.आयुषी देवानंद पाटील हिने प्रवेश घेतला. या योजनेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दि.२४ मे, २०१२ च्या अधिसूचनेत नमुद केल्यानुसार “मोफत जागेवर प्रवेश दिल्यावर, माहिती पत्रकाचे मुल्य, कोणतीही नोंदणी फी, शिकवणी फी किंवा कोणताही इतर आकार किंवा निधी, पालक किंवा बालक यांच्याकडून घेतला जाणार नाही.” असा उल्लेख असतांना सुध्दा मैकरुन स्टूडेंट अकैडमी कडून या शासनाच्या अधिसूचनेला डावलून स्वतःच्या मताचा अर्थ काढून नियमबाह्य व बेकायदेशीर पणे हजारो रुपयांची निरनिराळी फी वसूल केली जात आहे. एवढेच नव्हे तर सदर शाळेने दि.०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी लिखीत नोटीस देवुन रु.२५००/- ट्यूशन फी चे स्वरुपात भरणा करण्याचे सूचित केले. सदर रक्कम भरणा न केल्यास दंड करण्याचा दम सुध्दा देण्यांत येत असल्याची तक्रार देवानंद भाऊराव पाटील यांनी वणी पंचायत समितीच्या शिक्षणाधिका-याकडे केली. त्यानुसार पंचायत समिती कडून वरील प्रकाराची चौकशी करण्यात आली असून सदर चौकशी अहवालच आता संशयाच्या भोव-यात सापडलेला आहे. कारण तक्रारकर्त्याने शाळेकडून वसूल केलेल्या फी च्या पावत्या (पुरावे) लावुन तक्रार केली असतांना सुध्दा चौकशी अहवालात सदरहू शाळेला पूर्णतः “क्लिनचीट” दिल्याचे दिसते. शिक्षण विभागाने उपरोक्त प्रकरणाची चौकशी फक्त तक्रारींचे निराकरण करण्याकरीता केली कि शाळेत सुरु असलेल्या भोंगळ कारभारावर पडदा टाकून प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न केला? असा प्रश्न उपस्थित झाला असून शिक्षण विभागाच्या आशिर्वादाने तर वरील प्रकार घडत नाही ना? अशी शंका आता उपस्थिती केली जात असून असे असल्यास ही‌ फार मोठी गंभीर स्वरुपाची बाब असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे व याची निष्पक्षपणे चौकशी झाल्यास फार मोठा “शैक्षणिक घोटाळा” उघडकीस येवू शकतो.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News