23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणी तालुक्याच्या 9 हजार 251 हेक्टर जमिनीवर वनतळे निर्माणाची तात्काळ दखल   

वणी तालुक्याच्या 9 हजार 251 हेक्टर जमिनीवर वनतळे निर्माणाची तात्काळ दखल         

  प्रधान सचिव काय कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष      

सुरेंद्र इखारे वणी – सामूहिक वनहक्क समितीस मिळालेल्या पट्ट्यावर वनतलाव निर्माण करण्याच्या परवानगीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी मा वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याना दिले असता त्यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन कारवाईसाठी मा प्रधान सचिव (वने) महसूल, वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडे पाठविण्यात आले आहे.                 या निवेदनातून अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी ,वणी तालुक्यातील 55 गावामध्ये 9 हजार 251 हेक्टर आर जमीन सामूहिक वनहक्क दाव्यात प्राप्त झाली आहे. या जमिनीवर तेंदू, डिंक, वनफळे नसल्याने गावातील नागरिकांना रोजगार निर्मिती होत नाही .  या जमिनीवर शासनाच्या विविध योजने अंतर्गत रोजगार निर्माण मान्यतेसाठी  प्रस्ताव पाठविले परंतु तांत्रिक बाबीमुळे मान्यता मिळाली नाही असे निवेदनातून म्हटले आहे  मात्र या योजनेचा उद्देश नागरिकांना रोजगार देऊन आत्मनिर्भर बनविणे आहे.     वणी उपविभागात वृक्ष लागवड होऊ शकते परंतु पाण्याची गरज असल्याने त्यासाठी वनतलाव निर्माण करून गावातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल व युवक आत्मनिर्भर होईल अशी अपेक्षा निवेदनातून केली असतांना त्या निवेदनाची तात्काळ दखल  वन,सांस्कृतिक कार्ये, मस्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य मंत्री मा  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घेऊन कारवाईसाठी प्रधान सचिव यांचेकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रधान सचिव काय कार्यवाही करते याकडे वणी तालुक्यातील 55 गावातील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News