स्माईल फाउंडेशन संस्थेच्या उन्हाळी शिबिराचा समारोप
विद्यार्थ्यांनी घेतला शिबिरातील विविध उपक्रमाचा लाभ
फाउंडेशन च्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक
सुरेंद्र इखारे वणी-: वणी येथील स्माईल फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नगर भवन येथे पार पडला. या शिबिरामध्ये एकूण 41 मुलांनी भाग घेतला होता. दिनांक 15 एप्रिल ते 21 मे पर्यंत गुरु नगर येथे उन्हाळी शिबिर घेण्यात आले. स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात स्पोकन इंग्लिश, व्यक्तीमत्व विकास, विविध खेळ इत्यादींचा समावेश होता. समारोप कार्यक्रमात विजय चोरडिया, किरण देरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बोबडे, अर्चना पिदुरकर, समाजसेवक रवि रेभे यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
उन्हाळी शिबिर हे रोज दोन तास घेतले जायचे. या शिबिरात स्पोकन इंग्लिश, व्यक्तिमत्व विकास, वाचन कौशल्य, वृत्तपत्र वाचन, लेखन कौशल्य, व्याकरण, कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पिकिंग, आउट डोअर गेम, फन आणि लर्न गेम इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना अनुभवी व प्रोफेशनल शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तर आरोग्य हीच धनसंपदा यावर डॉक्टर सचिन दुमोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, सचिन जाधव, तन्मय कापसे, गौरव कोरडे, दिनेश झट्टे, कुणाल आत्राम, कार्तिक पिदूरकर, सचिन काळे, रोहित ओझा, तुषार वैद्य, युग बोबडे इत्यादींनी परिश्रम घेतले.