23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

*प्रतिकूल परिस्थितीत सोनमने घेतली बारावीच्या परीक्षेत गरुड झेप*

*प्रतिकूल परिस्थितीत सोनमने घेतली बारावीच्या परीक्षेत गरुड झेप *

सुरेंद्र इखारे वणी – नुकताच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2023 चा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं, असंच घवघवीत यश मिळवणारी विवेकानंद विद्यालयाची माजी विद्यार्थीनी, लोकमान्य टिळक महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणारी सोनम रघुवीर चंदेल हीने सुद्धा या परीक्षेत 86.33% गुण घेऊन गौरवास पात्र ठरली. पंचशील नगरातील चंद्रमुखी झोपडीत वास्तव्य करणारी, आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणारी, कबड्डीची राज्यस्तरीय खेळाडू निश्चितच गौरवास पात्र आहे. तहसील कार्यालयासमोर सोनम भेल भंडार हा वडिलांचा गुपचूप विक्रीचा पारंपारिक व्यवसाय ,घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून सुद्धा वडिलांनी मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिल. लहानपणापासूनच खेळाची व शिक्षणाची आवड असणारी सोनम जिद्दीला अथक परिश्रमाची जोड देत परिश्रम करीत राहिली. यश हे नशिबाने मिळणारी गोष्ट नसून इच्छित ध्येयपूर्तीसाठी सतत वाटचाल करीत राहणे म्हणजे यश होय हे तिने याद्वारे सिद्ध केले. जगातील सर्व यशस्वी लोकांच्या यशाचे एकच रहस्य आहे निरंतर परिश्रम आणि धैर्य जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मनुष्य साध्य करू शकत नाही. सोनमच्या परिश्रमाला व तिच्या धाडसाला याप्रसंगी त्रिवार अभिवादन करतो . तिने बघितलेल्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती होवो हीच याप्रसंगी मनोकामना. सोनमचे व तिच्या यशासाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंद व तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ती आपल्या यशाचे श्रेय आईवडील गुरुजनवर्ग याना देत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News