25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर जपताहे माणूसपण 

•कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर जपताहे माणूसपण

•कर्मचाऱ्यांची कमतरता तरीही सोय माञ पूर्ण….

सुरेंद्र इखारे वणी:- खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचं प्रमाण मोठं असताना कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे .महिलांना प्रसुतीच्या दरम्यान अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वणी तालुक्याअंतर्गत अनेक खासगी प्रसुतीगृहांची सोय असलेली हॉस्पिटल आहेत. यामध्ये अर्थातच खासगी हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचे प्रमाण मोठं असताना कायर येथील हॉस्पिटलमधून “नॉर्मल प्रसुतीची” एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.वणी तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यात कायर, शिरपूर, कोलगाव व राजूर या आरोग्य केंद्रात महिलांना डिलेव्हरीसाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या-औषधांचा खर्च सोडला तर सर्व इलाज हा मोफत केला जातो. खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात बिल येत असल्यानं सामान्य रूग्णांसाठी कायर आरोग्य केंद्र गर्भवती स्त्रियासाठी मोठा आधार ठरला आहे यात माञ काहीच शंका नाहीच.”उपलब्ध गोळ्या असेल तेव्हढेच ते वाटेल ते सुविधा देण्यात अग्रेसर असतात. परंतू एखाद अपवादच वगळता बाहेरून औषध आणण्याची वेळ येऊ देत नाही.

गर्भवतींची मोफत तपासणी :-

गर्भवती महिलांना कवडीचाही खर्च येऊ नये यासाठी गर्भावस्थेत करण्यात येणाऱ्या सर्व चाचण्या एचएलएल लॅबद्वारे मोफत करण्यात येतात. थायराईड, सीबीसी, मधुमेह, कावीळ,कोलेस्ट्राल,लिपीट प्रोफाईल, किडनी, हायपरटेंश रक्त व मधुमेह यांची तपासणी होते. गर्भवतींना संदर्भ सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या कार्यात आम्ही विशेष लक्ष घालत असल्यामुळे प्रसुतीचे प्रमाण सर्वाधिक आहे व अनेक प्रकारचे रुग्ण सेवा होईल शक्य तेवढं देत असतो.-
डॉ.रविंद्र देवगडे (प्राथमिक आरोग्य केंद्र, कायर)

 

कर्मचाऱ्यांची कमतरता तरीही सोय माञ पूर्ण..

रिक्त पदे:- आरोग्य सहायिका स्त्री,आरोग्य सहायक पुरुष , औषध निर्माता, आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, सफाई कामगार. या केंद्रावर कामाचा ताण अती असतानाही डॉ. देवगडे व डॉ.भक्ती काकडे हे दोघेही या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना हसतमुख सेवा देण्याचे कार्य अहोरात्र देत असताना दिसुन येत आहे. यांचा कार्याला कायर गावकऱ्यांचा सलाम…!

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News