राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती नागपुरात साजरी
बसपाचा पुढाकार
नागपूर जयंत साठे :- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती बसपाच्या वतीने राणी अहिल्यादेवी होळकर चौक अजनी येथे साजरी करण्यात आली. नागपूर मनपा तर्फे नुकतेच या चौकाचे नामकरण करण्यात आले असून तिथे अहिल्यादेवीचे तेलचित्र लावण्यात आलेले आहे. याच ठिकाणी बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, नागपूर शहर मुख्य प्रभारी ऍड सुमंत गणवीर, बसपाचे ज्येष्ठ नेते डॉ बी एन तायडे (अकोला) यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
अहिल्याबाई होळकर या मूळच्या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावातील. मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकरां सोबत वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. खंडेराव 1754 ला लढाईत मारल्या गेल्याने त्या 29 व्या वर्षी विधवा झाल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सती जाण्याऐवजी पेशवाई ठोकरुन त्यांनी स्वतः आपल्या संपूर्ण राज्याची सूत्रे हातात घेतली व 41 वर्ष त्यांनी आपला राज्य कारभार यशस्वीपणे सांभाळला. त्यांचे 1795 ला निधन झाले. दिल्लीतील राष्ट्रपती भवन होळकर घराण्याने दान दिलेल्या जमिनीवर आहे हे विशेष. अशा शूरवीर, महापराक्रमी, दानी राजमातेला बसपा ने कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत अभिवादन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम राऊत, राजकुमार बोरकर, सदानंद जामगडे, नितीन वंजारी, ऍड वीरेश वरखडे, परेश जामगडे, जनार्दन मेंढे, संभाजी लोखंडे, अनिल वाघमारे, महेश कळंबे, शामराव तिरपुडे आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.