महात्मा फुले समता परिषदेचे पोलिस आयुक्तांना निवेदन
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेखाचा परिणाम
नागपूर जयंत साठे –
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मा. पोलीस आयुक्तांना आज निवेदन देण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने एका निवेदनाद्वारे केली आहे.हे निवेदन नागपूर पोलीस आयुक्तांना दिले आहे.
निवेदन देतेवेळी मनोज गणोरकर, विद्या बहेकार, सचिन मोहोड योगेश ठाकरे आरिफ काजी आणि निशा मुंडे यांची उपस्थिती होती.