त्रिरत्न वंदना बौद्ध संस्कार विधी या
पुस्तकाचे विमोचन
नागपूर जयंत साठे – त्रिरत्न वंदना बौद्ध संस्कार विधी या पुस्तकाचे विमोचन नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात पार पडले. यावेळी बहुजन हिताय संघात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पुस्तक बौद्धाचार्य देविदास राऊत यांनी लिहिलेले असून या पुस्तकामुळे बौद्ध अनुयायांना अनेक विधी पार पाडण्यासाठी मोलाची मदत होईल असे विचार डॉ. शंकरराव खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
बौद्धचचार्य देवीदास राऊत. सी.एम.चव्हाण. डॉ. शंकरराव खोबरागडे,प्रीती खांडेकर, गजभिये ,भांगे यांनी मोलाची मदत केली.