25 C
New York
Saturday, July 13, 2024

ऐतिहासिकदृष्टया संपन्न वणी शहराला ” वणी जिल्हा” करण्याची मागणी     

ऐतिहासिकदृष्टया संपन्न वणी शहराला ” वणी जिल्हा” करण्याची मागणी           

वणी जिल्ह्याचा समावेश नागपूर विभागात करा      

  नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासासाठी वणीचे नाव देशभरात          

सुरेंद्र इखारे वणी -:     ऐतिहासिक दृष्टया संपन्न वणी शहराला “वणीजिल्हा” करून विभागीय कार्यालयीन कामकाजाचे दृष्टीने नागपूर विभागात समावेश करा या मागणीचे निवेदन राजाभाऊ पाथ्रडकर व वणी जिल्हा निर्मिती कृती समितीने मा राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा मा मुख्य सचिव, महसूल विभाग महाराष्ट्र राज्य सचिवालय मुंबई याना उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे मार्फत नायब तहसीलदार खिरेकर याना देण्यात आले.       वणी तालुका  हे ऐतिहासिक दृष्टया संपन्न असून पूर्वी 1864 मध्ये वणी जिल्ह्याची निर्मिती झाली. त्याचे प्रथम ” आश्रय वऱ्हाड जिल्हा”   असे नामकरण करण्यात आले. सण 1905 पर्यंत वणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गणले जात होते व शिरपूर येथे मुख्य पोलीस स्टेशन होते. त्यामुळे वणी शहराला वणी जिल्हा करून नागपूर विभागात समावेश करा .याकरिता खालील बाबीचा विचार करण्यात यावा (1) सद्यस्थितीत वणी तालुका हा यवतमाळ जिल्ह्यात समाविष्ट असून तो अमरावती विभागात आहे. (2) वणी ते यवतमाळ हे अंतर 109 की मी असून वणी ते  अमरावती अंतर 210 की मी आहे. वणी तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून वणी ते यवतमाळ अंतर 150 की मी तर अमरावती अंतर 260 की मी आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील नागरिकांना जिल्हा व विभागात कामास जाताना अडचणी येतात (3) वणी जिल्हा करताना वणी, मारेगाव ,झरी जामनी, शिरपूर तालुका निर्मिती, मार्डी, खैरी किंवा वडकी तालुका निर्मिती करून तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, वरोरा, भद्रावती तालुका संमिलीत करून आठ तालुक्यांमिळून  वणीला जिल्हा करण्यात यावा. (4) यापूर्वी शिरपूर तालुका होता पूर्वीपासूनच नागरिकांची मागणी आहे. (5) सण 1905 पूर्वी वणी जिल्ह्याचे ठिकाण होते. त्यानंतर यवतमाळ झाले. (6) वणीला जिल्हा करून नागपूर विभागास जोडल्यास वणी ते नागपूर अंतर केवळ 135 की मी चे असेल आणि वणी जिल्ह्यासाठी जे तालुके जोडणार त्यांचे अंतर केवळ 65 की मी चे आत असणार तसेच नागपूर विभागाचे तालुक्याचे अंतर सुध्दा 160 पेक्षा जास्त येत नाही . त्यामुळे वणी जिल्हा निर्मिती करून नागपूर विभागात जोडणे आवश्यक आहे. (7) भौगोलिक परिस्थिती सुध्दा वणी जिल्ह्यासाठी सहायक आहे कारण वर्धा , पैनगंगा , निर्गुडा नदी वणी तालुक्यातून वाहते.(8) वणी तालुका ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक दृष्टीने संपन्न आहे.या तालुक्यात मुख्यपिक कापूस, सोयाबीन व इतर पिके, तसेच खनिजामध्ये कोळसा, चुना, सिमेंट, डोलामाईत, व इतर गाऊन खनिजांनी व्याप्त असा तालुका आहे. (9) वणी येथे ब्रिटिश काळा पासून दळणवळणाची जसे रेल्वे असून नागपूर, मुंबई इतकेच नाहीतर तेलंगणा राज्यांना जोडणारा महामार्ग आहे ,राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, असल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासासाठी वणीचे नाव संपुर्ण देशभरात आहे. त्यामुळे वणी तालुका खनिज संपन्न असल्याने वणी जिल्हा झाला तर संपुर्ण तालुक्याचा विकास होईल या दृष्टीने  वणी शहराला वणी जिल्ह्याची निर्मिती करून नागपूर विभागाशी जोडण्यात यावे  अशा मागणीचे निवेदन संबधीत स्थानीय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याना देण्यात आले यावेळी निवेदनकर्त्यांनी वणी जिल्हा झालाच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर,  विजय पिदूरकर, राजू तुराणकर, राकेश खुराणा, प्रमोद निकुरे, ललित लांजेवार, रवी बेलूरकर, अजय धोबे, मंगल तेलंग, दिलीप भोयर,प्रमोद लोणारे, सुधीर साळी, तुळशीराम फुलझेले, सुनील डोंगरे, संजय तोमस्कर, सुरेंद्र इखारे, सागर जाधव, भडगरे, उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News