23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

ओबीसी वरील अन्याय व महापुरुषांची बदनामी व अपमान त्वरित थांबवा. ओबीसी जन महिलामोर्चाची मागणी.

ओबीसी वरील अन्याय व महापुरुषांची बदनामी व अपमान त्वरित थांबवा. ओबीसी जन महिलामोर्चाची मागणी.

नागपूर प्रतिनिधी जयंत साठे –  राज्य सरकारने मराठवाड्यामधील मराठा बांधवांना ओबीसी मध्ये आणण्याचा घाट घातलेला आहे .तशी समिती सुद्धा बनवली आहे. त्यामुळे ओबीसी वर हा सर्वात मोठा अन्याय होणार आहे .याचा विरोध तमाम ओबीसी बांधव करीत आहेत.
ओबीसी तसेच् मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याबाबत , ओबीसी महापुरुषांची होत असलेल्या बदनामी बाबत ,ओबीसी जन मोर्चा महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने परदेशी शिष्यवृत्ती करता जी नियमावली बनवली त्यात ओपन प्रवर्ग असलेल्या विद्यार्थ्यांची मर्यादा ही वीस लाख ठेवल्या गेली, आणि ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आठ लाख रुपये क्रीमिलर ची मर्यादा ठेवलेली आहे. हा ओबीसी वरील अन्याय आहे. महाराष्ट्र भवन या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवला गेला, महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही सुद्धा झाकल्या गेली,हे कृत्य करनार्यावर कारवाई करण्यात यावी .
तसेच सावित्रीबाई फुलेच्या संदर्भामध्ये ज्या वेबसाईटने आक्षेपार्य चुकीचे लिखाण केलेले आहे या उपटसभू संपादकावर त्वरित कारवाई करावी,व त्यांच्यावर बंदी आणावी, या मागणीचे निवेदन सुद्धा ओबीसी जन मोर्चा महिला आघाडी व भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने देण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व शहराध्यक्ष कमल खंडारे, डॉ. संजय ढाकुलकर तालुका अध्यक्ष सविता हजारे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनिता काळे, विदर्भ अध्यक्ष मायाताई गोरे, महिला अध्यक्ष माधुरी फेडर ,सहसचिव नीताताई दरणे, उपाध्यक्ष अनिता गोरे सहअध्यक्ष, कल्याणी मादेशवार संघटक .वैशाली फुसे संघटक ,सुनिता अनिल काळे सदस्य ,शोभना कोटबे मार्गदर्शक भीमराव ढेगळे मार्गदर्शक , शशिकांत लोळगे कर्मचारी नेते ,डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्रदेशाध्यक्ष , विलास काळे केंद्रीय कार्यकारणी सदस्य, यांनी सदर निवेदन दिलेला आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News