23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश रोकडे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळच्या  जिल्हाध्यक्षपदी अविनाश रोकडे।   

राष्ट्रहित व समाजहित जोपासत पर्यावरण पूरक कार्य

सुरेंद्र इखारे वणी : –    नुकतेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (NGO) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री प्रमोद दादा मोरे यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपन आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळी वर दखल घेवून यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सन २०२३ ते २०२६ या कालवधी करीता अविनाश रोकडे यांची निवड करण्यात आली.
अविनाश बाबारावजी रोकडे हे स्व माणिकराव पांडे (पाटील) विद्यालय फाळेगाव (कोल्ही) ता. बाभूळगाव जि. यवतमाळ येथे ३१ वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. त्यांना महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासन माजी बोर्ड मेबर महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळ अमरावती, अविरत राज्य तज्ञ मार्गदर्शक, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघ, सहा. आयुक्त स्काउट गाइड, माजी कोषाध्यक्ष शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था तसेच शाळेला पंचतारांकित हरित शाळा, जिल्हा प्रथम पुरस्कार मिळाला. हे सर्व स्व माणिकराव पांडे यांच्या आशीर्वादाने मिळाले असे सांगितले. मी माझे बुद्धी कौशल्य वापरून राष्ट्रहित व समाजहित जोपासत पर्यावरण पुरक कार्य करीन व संस्थेने माझ्यावर विश्वासाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडील व संस्थेचे नाव उज्ज्वल करेल असे यावेळी सांगीतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News