जीवनामध्ये योगाभ्यासाचे महत्व – योगगुरू नागोबाजी आवारी
इच्छाशक्ती योग ग्रुपची रौप्यमहोत्सवी वाटचाल
सुरेंद्र इखारे वणी – आजचे दैनंदिन जीवन यंत्रमय तथा मानसिक तनावाचे असल्याने मानवाच्या इच्छा व भावना चिरडून गेलेल्या आहे त्यामुळे आत्मिक उन्नतीसाठी जीवनामध्ये योगाभ्यासाची गरज आहे असे आंतरराष्ट्रीय योगा दिनी नागोबाजी आवारी यांनी विचार व्यक्त केले. आज दिनांक 21 जून 2023 रोज सकाळी 6 वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ इच्छाशक्ती योगा ग्रुप तर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इच्छाशक्ती योगा ग्रुपचे अध्यक्ष प्रगतिशील कास्तकार भिकाजी भोयर हे होते. प्रमुख मार्गदर्शक प्रयोगशील कास्तकार नागोबाजी आवारी उपस्थित होते. पुढे नागोबा आवारी म्हणाले आज मनुष्य अर्थहीन अर्थार्जनांकडे वळला असल्याने जीवन जगण्याचा अर्थच गमावून बसला आहे . असे प्रतिपादित करून योगाचे महत्व विशद केले आहे. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भिकाजी भोयर म्हणाले आज इच्छाशक्ती योगा ग्रुप रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये वाटचाल करीत आहे या ग्रुप मागे माजी तालुका क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे सर यांची प्रेरणा असून त्यांच्याच पुढाकाराने या ग्रुपची स्थापना झाली आहे असे भिकाजी भोयर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून या निमित्त सर्वांना योगा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व हा ग्रुप असाच अविरत चालत राहील याची शाश्वती त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शंकर वरहाटे यांनी केले सूत्रसंचालन पुरुषोत्तम आवारी यांनी केले तर आभार प्रभाकर सूर यांनी मानले . या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित डॉक्टर पद्माकर मत्ते, डॉक्टर किशोर पेचे, पुरुषोत्तम आवारी, डॉक्टर शंकर वरहाटे, प्रवीण इंगोले ,राजू पापट्टीवार, दिगंबर उपरे, प्रभाकर सूर, विजू काकडे , किशोर खाडे , मुरलीधर दौलत्कार, अनिल टोंगे, केशव जुमडे, भास्कर काळे,रमेश पेचे हे होते तर या कार्यक्रमाला विशेष सहकार्य किशोर खाडे यांचे लाभले आहे.