Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedविवेकानंद प्राथमिक शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप

विवेकानंद प्राथमिक शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप

विवेकानंद प्राथमिक शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप        

चिमुकल्यानी घेतला शिबिरातील उपक्रमाचा लाभ       

सुरेंद्र इखारे वणी –     येथील विवेकानंद प्राथमिक शाळेत गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या  उन्हाळी शिबिराचा समारोप करण्यात आला आहे.    या उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यादृष्टीकोणातून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  .      या शिबिरात परिसरातील व शाळेतील जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता .त्यामुळे येथील शिक्षकांनी  या उन्हाळी शिबिरात  चिमुकल्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच या शिबिरातील अभ्यासक्रमात विविध कलागुणांचा अंतर्भाव करण्यात आला होता शिबिरात विद्यार्थ्यांना   संगीत, हस्तकला, चित्रकला, नृत्य, योगा, विविध खेळ या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडीवृत्ती, निर्माण व्हावी, व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या दृष्टीकोनातून विविध खेळांचा व उपक्रमांचा  समावेश करण्यात आला  होता.  या शिबिराला तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळाला.  उन्हाळी शिबिराच्या  यशस्वीतेसाठी   विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिकार मॅडम, सौ कोलप्याकवार मॅडम, देवळकर मॅडम, ठमके सर, बेसेकर सर, राजगडकर सर, उपरे सर, मालेकर सर राठोड सर, गाडगे सर, आगलावे सर, गुळाने सर, यांनी परिश्रम घेतले.  या उन्हाळी शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ,सचिव व संचालक मंडळांनी कौतुक केले. 

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments