राजूर कॉलरी येथे दिवंगत शामेल देवानंद पेरकावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टिनपत्र्याचे वाटप।
“पेरकावार कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम”
सुरेंद्र इखारे वणी – वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य डेव्हिड पेरकावार यांनी आपले लहान भाऊ दिवंगत शामल देवानंद पेरकावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टिनपत्र्याची भेट दिली. आज दिनांक २३-६-२०२३ रोजी राजूर कॉलरी येथे स्मृती दिनाचे औचित्य साधून राजूर येथील दिव्यांग जाकीर मौला शेख यांना घरावर छप्पर टाकण्यासाठी टिनपत्रे देऊ केले. डेव्हिड पेरकावार यांनी लहान भावाच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वखर्चाने “टिन पत्रे” भेट स्वरूपात दिले हा पेरकेवार कुटुंबाचा सामाजिक उपक्रम आहे.
यावेळी अशोकभाऊ वानखेडे, माजी पं. समिती सदस्य, अनिल डवरे, सामाजिक कार्यकर्ता, . अर्जुन शेनगरपवार, युसुफभाऊ रहेमान नाना सुरपाम उपस्थित होते.
अशोकभाऊ वानखेडे, अनिल डवरे यांच्या कडून सुध्दा मदत देण्यात येणार आहे.