23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरणे आवश्यक – गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरणे आवश्यक – गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर   

सुरेन्द्र इखारे वणी:-     अध्यक्षीय भाषण करतांना गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरणे आवश्यक आहे.असे मत व्यक्त केले.     वणी तालुक्यातील मंदर येथील पोद्दार लर्निंग स्कुलमध्ये तालुक्यातील मुख्यध्यपकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर हे होते . प्रमुख अतिथी वणी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी किशोर गजलवार , विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे , विनोद नासरे, सतीश कुरेकर, देवराव चिडे ,रमेश बोबडे उपस्थित होते.  पुढे म्हणाले  की त्यासाठी शैक्षणिक साहित्य अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित करून दर महिन्याला आपण केलेल्या कामाच्या नोंदी ठळकपणे वर्गात लावण्यात यावे अशा सूचना सुध्दा दिल्या. या आढावा सभेचे प्रास्ताविक विषय तज्ञ विनोद नासरे यांनी केले. त्यानंतर त्यांनी शाळा पूर्व तयारी मेळावा 2, नाविन्यपूर्ण उपक्रम, वर्ग 1 ते 3 च्या माता पालकांसाठी माता पालक गट, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.त्यानंतर सभेचे प्रमुख अतिथी गटविकासाधिकारी किशोर गजलवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रत्येक शिक्षकाला आजच्या अद्ययावत शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांसाठी काम करायचे आहे. आपल्या देशातील श्रीमंत व गरिबांची जशी दरी आहे तशीच दरी खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत व मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेत आहे. त्यामुळे ही दरी मिटवून सरकारी शाळा दर्जेदार करण्यासाठी शिक्षकांना स्वतः मध्ये बदल करावा लागेल तेव्हाच मराठी शाळेचे भविष्य चांगले राहील. असे प्रतिपादन केले .तसेच  सतीश कुरेकर यांनी ऑन लाइन यु- डायस, आधारकार्ड नोंदणी कशी करावी याची माहिती दिली. विषय तज्ञ देवराव चिडे यांनी नवीन पाठ्य पुस्तकांच्या वितरणाबाबत मार्गदर्शन केले. रमेश बोबडे यांनी स्काऊट गाईड या विषयावर मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे यांनी पारंपारिक शिक्षण देण्याची पद्धत बदलवून विदयार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मेंदूला आव्हानात्मक काम देऊन त्यांच्यात शिकण्याची जिद्द निर्माण करा असा सल्ला उपस्थित मुख्याध्यापकांना दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी
निलेश बावणे, सूरज चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News