23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

बहुजन हिताय संघाची सभा संपन्न

बहुजन हिताय संघाची सभा संपन्न

नागपूर प्रतिनिधी जयंत साठे – :   बहुजन हिताय संघ ची 322 वी साप्ताहिक सभा शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे सकाळी 9.00 वाजता संपन्न झाली.
सभेला अध्यक्ष म्हणून सुरेश नारनवरे तर प्रमुख अतिथी म्हणून आनंद सहारे साहेब लाभलेले होते.
प्रथम सभेचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी आणि संस्थेचे उपाध्यक्ष अँड बी जी गजभिये साहेब यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मोमबत्ती अगरबत्ती प्रज्वलित केली
बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी सामुहिक बुद्ध वंदना घेतली
आजच्या सभेचे प्रमुख अतिथी आनंद सहारे यांनी उपस्थित धम्मसेवक,धम्मसेविका यांच्या कडून बावीस प्रतिज्ञा वदवून घेतल्या.
बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी ऊपस्थिताकडून आनापानसती चा अभ्यास करवून घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल दिनविशेष ची माहिती आणि भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील भागाचे वाचन प्रकाश सोनटक्के यांनी केले.
बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी सुत्तपठण केले. तसेच भन्ते साऱीपुत्र आणि भन्ते महामोग्गलायन यांना मारण्याविषयीच्या कट , कारस्थान बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच धम्मपद गाथा मधिल एक कथा सांगितली.
पुढील आठवड्यात ज्यांचे वाढदिवस येत आहेत त्यांचेअभिष्टचिंतन करून बौध्दाचार्य शांताराम रंगारी यांनी शुभेच्छा दिल्यात.
संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. बी. जी. गजभिये यांनी सोमवार दिनांक 26/6/2023 ला निघणा-या महामोर्चा वीषयी माहिती सभेला दिली.तसेच मोर्चा मध्ये सहभागी होण्याकरिता विनंती केली.
कुमार सार्थक खोब्रागडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात घडलेल्या घटनांची माहिती दिली.
23 जून 1947 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राष्ट्रध्वज समीती मध्ये निवड झाली होती त्या अनुषंगाने संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश सोनटक्के यांनी आपल्या राष्ट्रध्वजा बद्दल,ध्वजामधील रंगाबद्दल, ध्वजामधील अशोक चक्राबद्दल आणि चक्रामध्ये असलेल्या 24 आ-याबद्दल सविस्तर माहिती सभेला दिली.
आजच्या सभेचे प्रमुख अतिथी आनंद सहारे यांनी सांगितले की,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला बौद्धमय बनविणे आणि सत्ता ताब्यात घेणे हे सांगितले,पण आम्ही त्यांचे विचार अजुनही स्विकारले नसल्याने समाज विघटित झाला आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष अँड बी जी गजभिये यांनी त्यांना संस्थेचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन चे सचिव सी. एम. चव्हाण यांनी माहिती दिली की 26 तारखेला सोमवारी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन येथे सकाळी 9.00 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.सभेचे अध्यक्ष सुरेश नारनवरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला.त्याचा त्यांनी 21 वर्षे अभ्यास केला. ते पुढे म्हणाले की,सगळ्यांना राग येतो.माझ्यामते आपण जर मनावर घेतले तर कुणालाही राग येत नाही.आपण राग आणतो पण रागाला नियंत्रित करता येते.
आभार प्रदर्शन बौध्दाचार्य शांताराम रंगारी यांनी केले.
समापन गाथा बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटली.
राष्ट्रगीत अरुणा ताई पाटील आणि संगीता ताई पानतावणे यांनी सादर केले. सुत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष अँड बी जी गजभिये यांनी केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News