शाहु महाराज सामाजिक कार्य करणारा राजा – अंबादास मोहिते
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे -: समाजात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बदल घडवून आणणारे राजे राजर्षी शाहु महाराज हे दुरदृष्टी जोपासणारे होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य फार महान होते. आपल्या जनतेला त्यांनी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. शिक्षणाने माणूस मोठा होतो. मागासलेल्या समाजाचे शिक्षणामुळेच उत्थान होईल त्यांची आर्थिंक प्रगती होईल त्यामुळे त्यांनी सर्वांना शिक्षण सक्तीचे केले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना मुर्त रुप देण्याचे महान कार्य राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी केले. राजर्षी शाहु महाराज सामाजिक कार्य करणारा राजा होता असे प्रतिपादन मा.प्रा. अंबादास माहिते यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन नागपूर येथे छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्ताने प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन नागपूर येथे करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. अंबादास मोहिते बोलत होते.
ते पुढे म्हणतात शाहु महाराज केवळ सक्तीचे शिक्षण देऊन थांबले नाही तर त्यांनी मुलांना राहण्यासाठी वसतिगृहेही उभारली. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. रोजगार उभारण्यासाठी त्यांनी लोनची सुविधा दिली. स्वत: त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला. सर्वांना समान पातळीवर आणायचे असेल तर पातळीपासून खालच्या लोकांना वर आणावे लागेल यासाठी त्यांनी कार्य केले. फासे पारधी लोकांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करुन त्यांना आपल्या राज्यात रक्षक म्हणून नेमले व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. कौटुबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देण्यासाठी कायदा केला, आंतरजातीय विवाह कायदा केला, बाजारपेठा सुरु केल्या रेल्वे सुरु केल्या, समाजातला अन्याय, भेदभाव दूर करुन आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक न्याय देण्याचे महत्वपूर्ण कार्य राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी केले.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर हे होते. एक व्यक्ती आपले जीवनात किती चांगले काम करु शकतो याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शाहु महाराज. समाजातील विषमता दूर करण्याचे काम शाहु महाराजांनी केले. असे आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले शाहु महाराजांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आशा कवाडे संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, किशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर, कृष्णाजी इंगळे, दळवे, मायाताई घोरपडे, काकडे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले महामंडळ, ढगे, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चमोद्योग व चर्मकार विकास महामंडळ इ. उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रशांत गणेश आडे तर आभार प्रदर्शन श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर व त्यांचे कार्यालयातील श्रीमती अंजली चिवंडे, श्रीमती निलीमा मून, श्री. प्रशांत वासनिक, श्रीमती पेंदाम, श्रीमती कोडापे, श्रीमती गीते, श्रीमती मेश्राम, श्री. दिवाकर बदन श्री. सुशिल शिंदे, निलेश बोबडे, श्रीमती प्रिती नुन्हारे, विजय वाकोडीकर, राजेंद्र अवधूत, सुयोग पडोळे, जितेंद्र सातपुते इ. सर्व अधिकारी व कर्मचारी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांनी प्रयत्न केले.