23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

शाहू जयंती निमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

शाहू जयंती निमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

नागपूर जयंत साठे –
नागपूर: आरक्षणाचे जनक व तत्कालीन मागासवर्गीयांच्या शिक्षणाचे प्रेरणास्त्रोत राजर्षी छत्रपती शाहू यांचे 149 व्या जयंती निमित्ताने प्रबुद्ध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सहकार्य महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभ पार पडला.

हा समारोह टाकळी सिम मधील स्वयमदीप बुद्ध विहार लायब्ररी सभागृहात घेण्यात आला. यावेळी यशानंतरची विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचाल तसेच प्रवेश व शिष्यवृत्ती बाबत असलेली अज्ञानता या विषयावर याप्रसंगी प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून जीएसटी चे अधिकारी राजू गायकवाड, मानव अधिकार संरक्षण मंचचे आशिष फुलझेले, आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक उत्तम शेवडे, सामाजिक कार्यकर्ते आशिक बनसोड, आर्थिक विषयावर काम करणारे पारितोष रामटेके, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सुषमा गणवीर, बुद्ध विहार समन्वय समितीच्या सुनंदा नितनवरे ह्यांनी विविध विषयावर प्रामुख्याने मार्गदर्शन केले.

याप्रसंगी दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थिताद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या अनेक शंका कुशंकाचे याप्रसंगी मार्गदर्शकाद्वारे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद जामगडे यांनी तर समारोप चंद्रमणी गणवीर यांनी केला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशेषता कुंदा गणवीर, शिवपाल नितनवरे, सुमंत गणवीर, सुषमा नगराळे, तक्षशिला भगत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News