25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम त्वरित पूर्ण करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम त्वरित पूर्ण करा

सीनियर सिटीजन फोरमचा आंदोलनाचा इशारा

नागपूर प्रतिनिधी जयंत साठे-:    डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम अपूर्ण असताना सदर वास्तूचे लोकार्पण केल्याबद्दल आंबेडकरी समाजात तीव्रदोष व्यक्त होत आहे.त्यासाठी आज २९ जूनला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.प्रशासनाने पूर्ण तपासणी न करता 14 एप्रिल रोजी या सेंटरचे उद्घाटन करून हेतू पुरस्कार आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली आहे. सदर सेंटरचे काम दहा दिवसात पूर्ण करावे अन्यथा नागपूरमधील जनता मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारेल. त्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा सीनियर सिटीजन फोरमने दिलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल 2023 रोजी कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र कन्व्हेन्शन सेंटरची बरीचशी कामे अद्याही अपूर्ण आहेत .या सेंटरमधील सभागृह कॅफेटेरिया, 40 फुटाची बाबासाहेबांची मूर्ती, सांस्कृतिक थिएटरची बैठक व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल आणि परिसरातील कामे अपूर्ण असताना अशा वास्तूचे लोकार्पण करून आंबेडकरी समाजाचा घोर अपमान करण्यात आला असे जनतेचे मत आहे. उद्घाटनापूर्वी कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाची प्रशासनामार्फत कोणत्याच प्रकारची पाहणी न करता लोकार्पणाची विधी पूर्ण करण्यात आली. वास्तविक वास्तूचे लोकार्पण केल्यानंतर ते सामाजिक कार्याकरिता कार्यान्वित करणे अपेक्षित होते. पण लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवसापासून हे सेंटर बंद आहे. सेंटरच्या परिसरात पावर ब्लॉक, खिडक्यांच्या काचा, फिनिशिंग तसेच ए.सी.चे काम उद्घाटनाला तीन महिने लोटून सुद्धा पूर्ण झाले नाही. या आंदोलनात अतुल खोब्रागडे, धम्मानंद मनवर, सुधाकर स्थूल, महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे अरविंद पाटील, जगदीश राऊत, मंगेश नागदिवे, वैशाली गोस्वामी, अभिजीत मेश्राम आदींनी सहभाग घेतला

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News