बहुजन हिताय संघाची सभा संपन्न
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे :- बहुजन हिताय संघाच्या 323 व्या साप्ताहिक सभा डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन येथे सकाळी 9.00 वाजता संपन्न झाली
सभेला अध्यक्षा म्हणून आयुष्यमती वर्षाताई टेंभेकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून अँड.विलास राऊत साहेब लाभलेले होते.
प्रथम सभेच्या अध्यक्षा आयुष्यमती वर्षाताई टेंभेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अँड बी जी गजभिये साहेब, बौध्दाचार्य देविदास राऊत, बौध्दाचार्य शांताराम रंगारी यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मोमबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित केली.
बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी सामुहिक बुद्ध वंदना, त्रीशरण पंचशील घेतली
आजच्या सभेच्या अध्यक्षा आयुष्यमती वर्षाताई टेंभेकर यांनी बावीस प्रतिज्ञा चे वाचन केले
प्रज्ञापिठावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल दिनविशेष ची माहिती आणि भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील भागाचे वाचन प्रकाश सोनटक्के यांनी केले
सुत्तपठण बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटले तसेच तीन जुलै ला येत असलेल्या आषाढ पौर्णिमा चे महत्व सविस्तर सांगितले
भगवान गौतम बुद्ध यांनी 46 वर्षावास केले आणि कोणत्या ठिकाणी केले हे सविस्तर माहिती देऊन सांगितले
पुढील आठवड्यात ज्यांचे वाढदिवस येत आहेत त्यांचेअभिष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा बौध्दाचार्य शांताराम रंगारी यांनी दिल्यात
आपले मनोगत व्यक्त करतांना प्रकाश सोनटक्के यांनी आज 1 जुलै ला कर्मवीर हरदास आवळे यांची 108 वी जयंती प्रित्यर्थ त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली
प्रमुख अतिथी अँड विलास राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आंतरजातीय विवाहाचे समर्थक होते कलम 25 नुसार प्रत्येकाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे कलम 19 नुसार बोलण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे संपूर्ण जग राज्यघटनेला मान्यता देते*परंतु आता संपूर्ण वेगळे होत आहे आंतरजातीय विवाहामुळे जातीयता कमी होण्यास मदत होते
सर्वच मोठमोठे निर्णय माणसंच घेतात*स्त्रीयांना काही माहिती सुध्दा नसते*हि फार मोठी शोकांतिका आहे जेव्हा आपल्यावर अडीअडचणी येतात तेंव्हा आपण पत्नीला सांगतो
99% आपल्या स्रीया खरे बोलतात
कलम 12 विषयी सविस्तर सांगितले*याव्दारे स्त्रियांना संरक्षण दिले आहे
तसेच त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग सांगितला
एखादा गरजू व्यक्ति तुमच्या समोर आला तर त्याच्या अडचणीच्या वेळेस त्याला अवश्य मदत करा*कितीही त्रास झाला तरी समाजकार्य सोडू नका
मे 1998 एक कायदा लागू झाला होता ज्यामध्ये स्त्रियांना पतीच्या प्रापर्टी, वडीलांच्या प्रापर्टी मध्ये हिस्सा दिल्या जातो
प्रत्येक व्यक्ती ने आपल्या एका मुलाला तरी वकील करायला पाहिजे*आपल्या मुलांना व्यापार करायला सांगा
आजच्या सभेच्या अध्यक्षा आयुष्यमती वर्षाताई टेंभेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,
मला ईथे येऊन पाच वर्षे झाली आहेत*आपण ज्यांना सदस्य बनवितो त्यांना संपूर्ण माहिती आपण द्यायला पाहिजे*दर पौर्णिमेला विहारास भेट द्यावी*आज माझा वाढदिवस आहे,आज माझा नवीन जन्म झाला आहे
तसेच त्यांनी आपल्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती सभेला दिली. आपण काय करायचे ते आपल्या वरच अवलंबून आहे आपल्या आपल्या मध्ये च स्रिया काहीही बोलत असतात हे योग्य नाही
संधी दिल्याबद्दल धन्यवाद दिले
आभार प्रदर्शन बौध्दाचार्य शांताराम रंगारी यांनी केले
समापन गाथा बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटले
राष्ट्रगीत अरुणा ताई पाटील आणि संगीता ताई पानतावणे यांनी सादर केले
आजच्या सभेचे उत्कृष्ट आणि सुंदर सुत्रसंचालन संस्थेचे सचिव माननीय हंसराज भांगे यांनी केले
आजच्या सभेला मार्गदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष अँड बी जी गजभिये साहेब यांनी केले
आजच्या सभेला उपस्थितांना अल्पोपहार आयुष्यमती वर्षाताई टेंभेकर यांच्या कडून देण्यात आला