कलावंत न्याय हक्क समितीची सभा संपन्न
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे -: महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती नागपूर शहर व ग्रामीण भागाची सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संगीता उराडे तर प्रमुख अतिथी म्हणून शालिक जिल्हेकर, अरविंद पाटील, शत्रुघ्न लोणारे, भारती हिरेखन,अल्काताई माटे, जगदीश राऊत, प्रतिभा पाटील, उपस्थित होते. यावेळी नागपूर जिल्हा महासचिवशालिक जिल्हेकर, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद पाटील, महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष प्रतिभा पाटील, भारती हिरेखन, शहर कोषाध्यक्ष शत्रुघ्न लोणारे, मुख्य संघटक नरेश मेश्राम, शहर उपाध्यक्ष संजय सायरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. व सर्व पदाधिकाऱ्यांनी सभासद शुल्क भरले.
या संघटनेच्या शाखा शहर व ग्रामीण भागात तयार करण्यासाठी सर्व पदाधिकारी कामाला लागले असून त्यांनी ग्रामीण भागातील उपेक्षित कलावंतांना नाममात्र सदस्यता शुल्क घेऊन त्यांना सदस्य बनवावे असा ठराव पास केला. यावेळी शालिक जिल्हेकर, अरविंद पाटील, शत्रुघ्न लोणारे, संजय सायरे,भारती हिरेखन, अल्काताई माटे, जगदीश राऊत यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष जयंत साठे, संचालन सुनंदा गायकवाड तर आभार प्रमोद कांबळे यांनी मानले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.