नृसिंह व्यायाम शाळेत शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचा समारोप
सुरेंद्र इखारे वणी – येथे स्वातंत्र्यपूर्व काळातील 1928 ची स्थापना असलेल्या नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणावर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या उन्हाळी शिबिरातील शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षणाचा समारोप दिनांक 2 जुलै 2023 रोजी करण्यात आला. यावेळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी एसडीपीओ गणेश किंद्रे, वणीचे ठाणेदार अजित जाधव, खरेदी विक्री संघाचे संचालक राजाभाऊ पाथरडकर, ऍड निलेश चौधरी, व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सुभाष तिवारी, माजी मुख्याध्यापक अशोक घुगुल, संस्थेचे सचिव पुरुषोत्तम आक्केवार, व्यायाम शाळेचे वस्ताद देवरावजी गव्हाणे, प्रशिक्षक मार्गदर्शक राजू गव्हाणे तसेच कु तेजस्विनी गव्हाणे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन कु तेजस्विनी गव्हाणे हिने शिवकालीन खेळाचे संदर्भात माहिती दिली. तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये 80 ते 90 चिमुकले प्रशिक्षणार्थी होते. यामध्ये 4 वर्षांपासून तर 16 वर्षांपर्यंत मुलामुलींनी गणवेश परिधान करून शिस्तबद्ध पध्दतीने सहभाग घेतला होता. प्रात्यक्षिक दाखवीत असताना चिमुकल्यानी शिवकालीन मर्दानी खेळात लाठीकाठी, तलवारबाजी, दांड पट्टा, बाणा, भालाफेक, चक्र, यासारख्या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशिक्षक मार्गदर्शक राजू गव्हाणे यांनी मानले कार्यक्रमाला उपस्थित दादाराव राऊत, दिलीप येमुलवार, रमेश शर्मा, पांडुरंग ताटेवार, बंडू खिरेकर , सूर्यकांत मोरे, अजय बोबडे, रमेश उगले, नागो नलभीमवार, सुनील अक्केवार, संध्या रामगिरवार ,सुमित्रा गोडे, मंगला झिलपे, अलका जाधव, वैशाली तायडे, पालकवर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नृसिंह व्यायाम शाळेच्या सर्व संचालक मंडळ व व्यायामपटू तसेच कबड्डीच्या खेळाडूंनी पुढाकार घेतला.