- रानडुकराच्या हल्ल्यात बकऱ्या चाराईगर ठार….
- शिरपूर ठाण्याच्या हद्दीतील घटना
- सुरेन्द्र इखारे वणी – वणी तालुक्यातील पिंपरी (कायर)
येथील शेतमजूर कायर जवळील शेतशिवारात बकऱ्या चरायला गेला असताना अचानक रानडुकराने हल्ला केला या हल्ल्यात वयोवृद्ध नामदेव सोयम वय 65 वर्षे बकऱ्या चाराईगर शेतमजूर जखमी होऊन जागीच ठार झाला. पिपरी कायर येथील शेतशिवारातील जंगलात आज दिनांक 4 जुलै 2023 रोज दुपारच्या दरम्यान बकऱ्या चारणाऱ्या वयोवृद्ध इसमावर अचानक रानडुकराने हल्ला केल्याने पिंपरी येथील वयोवृद्ध नामदेव सोयाम जागीच ठार झाला.तो नेहमीप्रमाणे स्वतःच्या व इतरांच्या बकऱ्या घेऊन आज सकाळी 11 वाजता च्या दरम्यान कायर पिंपरीच्या जंगलात बकऱ्या चारायला गेला असताना. दुपारी 2 वाजताच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्या चाराईगरावर रानडुकराने हल्ला केला त्यात तो जबर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यूव झाला .या घटनेची माहिती शिरपूर पोलिसाना देण्यात आल्याने त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.व प्रेत ग्रामीण रूग्णालय वणी येते पाठविण्यात आले.त्यांच्या पाठीमागे पत्नी.दोन मुले, नातंवड असा परिवार आहे.