23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

सनदी अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक बनवून फसविण्याचा प्रयत्न

सनदी अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक बनवून फसविण्याचा प्रयत्न

पत्रकाराच्या जागृततेमुळे हानी टळली
जयंत साठे नागपूर  –  सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे यांच्या नावाने बोगस फेसबुक व मॅसेंजर अकाउंट बनवून आमचे नागपूरचे जयंत साठे यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु जागृत पत्रकाराच्या सदसदविवेकबुद्धीने हा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की एका संतोष कुमार नामक सायबर गुन्हेगाराने नांदेड येथून जम्मू-काश्मीरला बदली झाली असून घरातील सोफा, पलंग, वॉशिंग मशीन, फ्रिज, डायनिंग टेबल, कपाट व इतर वस्तू केवळ 60000 रुपयात देऊन सिआरपीएफ च्या ट्रकने घरपोच सेवा देण्याचे कळविले होते. सदरहू इसम हा नांदेड येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु त्या व्यक्तीच्या संदर्भात संशय आल्यामुळे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्याम तागडे यांच्या मेसेंजरवरून मेसेज केल्यामुळे शंका आली. याबाबत मी माझ्या सीआरपीएफ मध्ये अधिकारी असणाऱ्या मित्रांना विचारणा केली असता त्यांनी सीआरपीएफ चा असा ड्रेस कोड नसल्याचे सांगितले. तसेच संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारे ऑनलाईन वरून पैसा पाठवू नये अन्यथा तुमचे संपूर्ण अकाउंट खाली होईल असे सांगितले. त्यामुळे होणारी मोठी हानी टळली.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News