23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

सत्ता हातात आल्याशिवाय बहुजनांचा विकास होणार नाही -अरुण गाडे*

*सत्ता हातात आल्याशिवाय बहुजनांचा विकास होणार नाही -अरुण गाडे*

नागपूर ( जयंत साठे):-   वंचिताच्या हातात सत्ता आल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र कास्ट्राईब कामगार संघटनेचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी केले.
यशस्वी सामाजिक सेवा भावी संस्था मार्फत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त10 वी 12वी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एन.ए.ठमके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण गाडे हे होते. त्यांनी आज देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जातीयवादी शक्ती वंचिताचे हक्क हिरावून घेत आहे,संविधानाने देशात मनू व्यवस्या बदलून क्रांती केली. परत ब्राह्मणी व्यवस्था लादल्या जात आहे. वंचिताचा विकास करावंयचा असेल तर सत्ता हातात घ्यावीच लागेल असे प्रतीपादन केले.समाज विकास संस्था द्वारा आयोजित अरविंद पाटील याचें वाढदिवसानिमित्त तसेच गुणवंत विध्यार्थी यांच्या सत्काराचे वेळी ते बोलत होते.या प्रसंगी प्रा.डाॅ. एम एस वानखेडे, प्रतिभाताई पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी एन एम ठमके यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले सुधाकरजी स्थुल,तथागत अभ्यासिका ,अध्यक्ष नागपूर,यानी गुणवंत विध्यार्थ्यांना विस्तृत माहिती देऊन अरविंद पाटिल यानां वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विषेश उपस्थिती सारिकाताई उराडे, विदर्भाध्यक्ष महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती चंद्रपूर, यांनी पण विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शेती कन्या सुशीला बिडकर व मंगला बिडकर भगिनींना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज गायकवाड मार्गदर्शक, यांनी वक्तव्य केले की, प्रत्येक पालकांना असे वाटते की, आपला पाल्य डॉक्टर,इंजिनिअर,झाले पाहिजे. पण ते दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा करिअर करू शकतात. त्यासाठी प्रयत्न करावे.
प्रमुख उपस्थितात प्रतीभाताई पाटिल अध्यक्ष यशस्वी सामाजिक सेवा भावी संस्था, नागपूर.) विशेष सत्कार मुर्ती शेती कंन्या उच्चशिक्षित सुशीलाताई बिडकर, बेबी बिडकर भगिनी पुसला जिल्हा अमरावती यांनी आपल्या वक्तव्यातून शेती करीत असताना महामानवाचां आदर्श पुढे ठेवून समाजाशी झुंज देऊन दहा किलोमीटर रस्ता पायी जाणे व पायी येणे यापध्दतीने पाच ऐकर शेतीत संत्री,आबां ,गहु ,तुर,कापुस अशी शेती करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भीमगीत, बुद्ध गीतांनी करण्यात आली.
पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व काही वस्तू भेट दिल्यात.तसेच कृषी दिनानिमित्त शेती कंन्या सुशिला बिडकर व बेबी बिडकर यानां स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिकारी आई सावित्री व महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा व शाँल भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अरविंद पाटिल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी शालिक जिल्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणून माणिक खोब्रागडे, जयंत साठे, देविदास तुळसा शिवाजी भांगे ,विकल जिल्हेकर,सुभाष मानवटकर,डॉ. सुंनदा जुलमे,डॉ. मोनाली फोफरे ,प्रतिभा सहारे,सजंय गोडघाटे, निषातं पाटिल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद काबंळे व पिंकी बागडे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.सूनंदा गायकवाड यांनी केले.
आयोजक समिती प्रतिभाताई पाटील, डॉ. मनिष वानखेडे, अरविंद पाटील, सुनंदा गायकवाड, प्रमोद काबंळे, भारती हिरेखन, प्रा.माया काबंळे, ज्योती पाटील, पिंकी बागडे व ईतरांनी कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी प्रयत्न केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News