23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

अभ्यासाचे सूत्र आणि वेळेचा सदुपयोग केल्यास करिअर घडविता येते – मा. विजय मुसळे सर

 

अभ्यासाचे सूत्र आणि वेळेचा सदुपयोग केल्यास करिअर घडविता येते – मा. विजय मुसळे सर

  • सुरेंद्र इखारे वणी:–  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असून अभ्यासाचे सूत्र आणि वेळेचा सदोपयोग केल्यास आपल्याला आपले करिअर योग्य पद्धतीने घडविता येते तसेच डॉक्टर, इंजिनिअर या व्यतिरिक्त सुद्धा अनेक करिअरच्या वाटा अस्तित्वात आहेत.विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन आपले क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन “करिअरवाला” पुस्तकाचे लेखक तथा Success Point, चंद्रपूरचे संचालक मा. विजय मुसळे सर यांनी व्यक्त केले.           सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि मंडल आयोगाचे पुरस्कर्ते व्ही.पी.सिंग यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करिअर मार्गदर्शन सेमिनार आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच शेतकरी मंदिर, वणी येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रदिप बोनगीरवार, अध्यक्ष, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, उदघाटक म्हणून मा.संजय खाडे,अध्यक्ष, रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी, तर प्रमुख अतिथीमध्ये मा.आशिष खुलसंगे, अध्यक्ष, वसंत जिनिंग, वणी, बाबाराव ढवस, वैभव ठाकरे, मंदाताई बांगरे, विजयाताई आगबत्तलवार, रमाताई क्षिरसागर, भाऊराव मत्ते, प्रशांत गोडे सर, किशन खुंगर, सुरेश मांडवकर, सुरेश बन्सोड, विजय माळीकर, सिद्दीक रंगरेज, नितीन धाबेकर, दिवाकर नरुले सर, नंदुभाऊ पांडे आणि नितीन मांदाडे हे OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील समाजाचे प्रतिनिधी विचारपीठावर उपस्थित होते.या प्रसंगी वर्ग 10 आणि 12 वी मध्ये प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींमत्वांचाही विशेष सत्कार करण्यात आला.यामध्ये फुटबॉलपटू पार्थ चौधरी, लाठीकाठी व दांडपट्टा प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे, इंडोनेशिया येथे युवा परिषदेत सहभाग नोंदवलेले संदिप गोहोकार, डॉ. तन्वीर शेख, PSI पदी निवड झालेल्या शिवाली उलमाले आणि प्रियंका गेडाम यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र आंबटकर सर यांनी, तर सूत्रसंचालन सोनाली जेनेकर व प्रदिप बोरकुटे सर आणि आभार प्रदर्शन नारायण मांडवकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वणीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News