कांबळे दुहेरी हत्या प्रकरणी
सर्व आरोपींना जन्मठेप
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे -: कांबळे दुहेरी हत्याकांडात नागपूरच्या सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत आपला निर्णय दिला आहे. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. गावंडे यांनी शुक्रवारी हा निकाल सुनावल्याने राज्याच्या उपराजधानीवर निर्माण झालेल्या सस्पेन्सला पूर्णविराम मिळाला. न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश शाहू हा हुडकेश्वर येथील पवनपुत्र नगर येथील रहिवासी आहे. आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया उर्फ गुड्डी आणि त्याचा भाऊ अंकित यांचाही समावेश आहे. उषा कांबळे आणि तिची नात राशी अशी या मृतक महिलांची नावे आहेत.पत्रकार रवी कांबळे यांची आई आणि मुलीची हत्या आरोपीने केली होती.