25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

जागतिक परिवर्तनात नवीन शैक्षणिक धोरण अनिवार्य – डॉ. अनंत मराठे

जागतिक परिवर्तनात नवीन शैक्षणिक धोरण अनिवार्य – डॉ. अनंत मराठे
सुरेन्द्र इखारे वणी :-       ” प्रथम वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ३० टक्के विद्यार्थी अंतिम वर्षापर्यंत पोहोचतात, कोणत्याही वर्गाचा एकत्रित पूर्ण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल १८ टक्क्यांच्या च्या वर राहत नाही. तर उत्तीर्ण विद्यार्थी देखील स्वतःच्या भरवशावर स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही ही शिक्षण व्यवस्थेची भीषण वास्तविकता पाहता शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तनाची अनिवार्यता निर्माण झाली असून जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या चिंतनात आणि जागतिक स्पर्धेच्या वास्तवात आपल्याला टिकायचे असेल तर नवीन शैक्षणिक धोरण ही केवळ भूमिका नसून अनिवार्यता आहे. आपल्या सगळ्यांना हे बदल स्वीकारून नवीन पिढीला आगामी समस्यांसाठी सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही.” असे विचार हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. अनंत मराठे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात वणी परिसरातील विविध सहा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय नवीन शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळेत ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव लक्ष्मण बेदी यांच्यासह सहसचिव अशोक सोनटक्के, प्राचार्य प्रसाद खानझोडे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेची प्रस्तावना करताना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अनेक प्राध्यापकांच्या मनात देखील विविध शंका असून त्यांच्या निरसनासाठी केवळ कर्णोपकर्णी पसरणाऱ्या गोष्टीं वरून आपली मते ठरविण्यापेक्षा या क्षेत्रात मूलभूत कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून हे समजून घ्यावे यासाठी ही कार्यशाळा असल्याचे अधोरेखित करीत, स्वातंत्र्योत्तर काळात स्वीकारलेल्या मास एज्युकेशन या अनिवार्य रचनेत क्लास एज्युकेशन ची स्थापना करणे नवीन शैक्षणिक धोरणाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
आरंभी विद्यार्थ्यांच्या समोर आणि नंतर प्राध्यापकांच्या समोर दोन सत्रात डॉ.अनंत मराठे यांनी दोन्ही पातळीवर या विषयाची सविस्तर मांडणी केली. आजपर्यंतची शैक्षणिक व्यवस्था जे आहे तेच देणारी पंगत व्यवस्था होती मात्र आता विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार आवश्यक तेवढेच आणि आवश्यक ते स्वीकारण्याची सुविधा देणारी ही आधुनिक बफे पद्धती आहे असे सांगत आजपर्यंत समस्या तयार करणाऱ्या किंवा त्यावर फक्त चर्चा करणाऱ्या या पद्धतीच्या परिवर्तनातून समस्या निवारक स्वरूपात पुढील पिढीला सिद्ध व्हावे लागेल हे अधोरेखित केले. जागतिक पातळीवर सुनिश्चित करण्यात आलेल्या १७ प्रश्नांच्या बाबतीत समस्या निवारक स्वरूपात जे स्वयंसेवक म्हणून सिद्ध होतील तेच भविष्यात यशस्वी होऊ शकतील हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्राध्यापकांच्या समोर मांडलेल्या चिंतनात प्राधान्याने आयआयटी सारख्या संस्थांना देखील मानव्य विज्ञानाचे विषय स्वीकारण्याची आलेली वेळ सांगत आपल्याला वेळीच परिवर्तन करण्याची आवश्यकता अधोरेखित करीत ज्ञाना सोबत कौशल्याच्या समन्वयाची अनिवार्यता सांगून, सातत्यपूर्ण मूल्यांकनाचे जागतिक महत्त्व स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि नवनवीन शैक्षणिक साधनांच्या आगामी अफाट विस्ताराच्या काळात केवळ माहिती स्वरूपातील शिक्षणाला काही स्थानच नाही हे स्पष्ट करीत चारित्र्य निर्मिती आणि कौशल्य निर्मिती यांच्याशिवाय पर्याय उरणार नाही म्हणून नवीन शैक्षणिक धोरण अनिवार्य आहे असे ठाम प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये ॲड. लक्ष्मण भेदी यांनी व्याख्यानात सांगितलेल्या स्वरूपात आमच्या पिढीने खरोखरच केवळ मागील री पुढे ओढली हे सांगत या नवीन उपलब्ध संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन कार्यशाळेचे संयोजक डॉ.करमसिंग राजपूत यांनी केले. कार्यशाळेत लोकमान्य टिळक महाविद्यालयासह वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News