25 C
New York
Saturday, July 13, 2024

बहुजन हिताय संघाची साप्ताहिक सभा संपन्न

बहुजन हिताय संघाची साप्ताहिक सभा संपन्न
नागपूर जयंत साठे  (प्रतिनिधी)  :-  बहुजन हिताय संघा ची साप्ताहिक सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन येथे शनिवारी संपन्न झाली.आजच्या सभेचे अध्यक्ष बबनराव मोटघरे तर प्रमुख अतिथी म्हणून सखाराम मंडपे उपस्थित होते.
प्रथम सभेचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मोमबत्ती अगरबत्ती प्रज्वलित केली.
बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी त्रीशरण, पंचशील आणि बुद्ध वंदना सामुहिक रित्या वदवून घेतल्या.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर खोब्रागडे यांनी आनापानसती चा अभ्यास ऊपस्थिताकडून वदवून घेतल्या.
प्रमुख अतिथी सखाराम मंडपे यांनी 22 प्रतिज्ञा ऊपस्थिताकडून वदवून घेतल्या.
उपस्थित पाहूण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल दिनविशेष ची माहिती आणि भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील भागाचे वाचन प्रकाश सोनटक्के यांनी केले.
मागील एक वर्षापासून आम्ही विहारात पाली भाषेचे वर्ग नियमित चालवित आहोत अशी माहिती सुरेश पानतावणे यांनी दिली.
सुत्तपठण बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटले.तिसऱ्या नंबर ची गाथा सांगून त्याचे मराठीत अर्थ समजावून सांगितले.
पूज्य भन्ते डॉ संघकिर्ती यांनी ते चालवित असलेल्या महिला सशक्तीकरण संगठन बद्दल सविस्तर माहिती सभेला दिली.त्यांनी सांगितले की, त्यांनी चार वर्षे भिक्खू ची ट्रेनिंग घेतलेली आहे. ते पुढे म्हणाले की,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, फक्त पठण करुन काही होत नाही त्यांचे आचरण करावे लागत.
ज्ञान प्राप्त करून ते ज्ञान आपल्याच पर्यंत सिमीत ठेवले तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही.ज्ञानाचा उपयोग इतरांना केला पाहिजे.त्याचा ईतर दुसऱ्यांना उपभोग घेता आला पाहिजे.
पूज्य भन्ते यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या लहानपणी ची एक गोष्ट सांगून वर्षावास मध्ये धम्म श्रवण करावेअसे सांगितले.
आजच्या सभेचे प्रमुख अतिथी सखाराम मंडपे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या संघटनांची सुरवात फार प्रभावी पणे होते,पण संघटना शेवट पर्यंत सुरू राहत नाही.तसेच त्यांनी
दहा पारमिता पैकी दहाव्या पारमिता बद्दल माहिती सांगितली.
दान निस्वार्थ पणे द्यायला पाहिजे.दान देतांना आपल्याला काही मिळेल हि अपेक्षा करु नये.
धम्मदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे.
प्रथम बुद्ध आणि धम्म यामध्ये प्रविण व्हा.लोकांच्या भल्याकरीता दान दिले पाहिजे.राजा बिंबीसार यांनी भगवान बुध्दांना दान दिले होते.याचा उल्लेख करून
बाबासाहेबांच्या चळवळीकरीता दान दिले पाहिजे.धम्मकार्याकरीता वेळ दिला पाहिजे.ते पुढे म्हणाले की, समाजात तीन प्रकारचे लोक असतात वक्ता,प्रवक्ता आणि अभिवक्ता पण खरी गरज अभिवक्ताची आहे.तसेच आपला मीडिया खुप आवश्यक आहे.पुढील आठवड्यात ज्यांचे वाढदिवस येत आहेत त्यांचेअभिष्टचिंतन करून बौध्दाचार्य शांताराम रंगारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
आजच्या सभेत नवीन सभासद मनोरमा नारनवरे, सिध्दार्थ मेश्राम, अरविंद मुल यांनी आपला परिचय सभेला करून दिला आणि पाच हजार रुपये भरून सभासद होण्याची हमी दिली.अरुणा ताई पाटील यांनी सभेला उपस्थित उपासक ऊपासिका यांना संस्थेला आर्थिक मदत , सहयोग करण्याची विनंती केली.
आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय बबनराव मोटघरे यांनी आपल्या भाषणात चार आर्य सत्य विषयी सविस्तर माहिती सभेला दिली.दुःखाचे कारण, दुःखाचे निराकरण, करण्यासाठी आर्य अंष्टागिक मार्ग विषयी सविस्तर माहिती सभेला दिली.
आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव माननीय अँड हंसराज भांगे साहेब यांनी केले.
समापन गाथा बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटले.
राष्ट्रगीत अरुणा ताई पाटील यांनी सादर केले.सुत्रसंचालन आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. शंकर खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News