25 C
New York
Saturday, July 13, 2024

श्री दत्तात्रेय यदु संवाद ग्रंथाचे २१ जुलैला प्रकाशन.

श्री दत्तात्रेय यदु संवाद ग्रंथाचे २१ जुलैला प्रकाशन.

सुरेन्द्र इखारे वणी :-   श्रीमद् भागवत महापुराणांमध्ये एकादश स्कंधात आलेला श्री दत्तात्रेय यदु संवाद हा भारतीय संस्कृतीच्या चिंतकांसाठी एक श्रेष्ठ आधारभूत ठेवा आहे.
भगवान श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवण्याची घोषणा केल्यानंतर आपल्या शिवाय आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न भक्तराज उद्धवाने केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना केलेल्या उपदेशामध्ये हे अवधूत आख्यान आलेले आहे.
आयुष्यात सुख, शांती, समाधान, प्रसन्नतेचा अनुभव घ्यायचा असेल तर भगवान दत्तात्रेयांचा उपदेश समजून घ्यावा असे सांगत भगवान श्रीकृष्ण हा संवाद आपल्यासमोर ठेवत आहेत.
महाराज यदूंनी भगवान दत्तात्रेयांच्या अलौकिक शांतीला, समाधानाला पाहून त्याचे रहस्य विचारल्यानंतर भगवान दत्तात्रय यांनी त्याला स्वतःच्या २४ गुरूंची महती वर्णिलेली आहे.
या २४ गुरूंच्या माध्यमातून मी काय काय शिकलो? हे सांगत भगवान दत्तात्रेय, आपल्याला शिकायचे असेल तर कुठूनही शिकता येते. हा संदेश आपल्याला देत आहेत.
वेगळ्या अर्थाने भारतीय स्वयं शिक्षा पद्धती असणाऱ्या या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण संवादावर लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृतचे प्राध्यापक, सुप्रसिद्ध वक्ता तथा लेखक विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांनी यवतमाळ येथील साप्ताहिक स्वदेश मध्ये प्रकाशित केलेल्या लेखमालिकेचा हा संग्रह जळगाव येथील अविरत प्रकाशनाचे श्री जयंत कुलकर्णी प्रकाशित करीत आहेत.
अधिक श्रावण शुद्ध चतुर्थीच्या पावन-पर्वावर २१ जुलै २०२३ रोजी प्रकाशित होणाऱ्या या ग्रंथाच्या माध्यमातून प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या ग्रंथांची संख्या ६७ होत आहे हे विशेष उल्लेखनीय.
प्रत्येक दत्तभक्ताच्याच नव्हे तर भारतीय संस्कृती प्रेमी व्यक्तीच्या चिंतनाला अत्यंत व्यापक स्वरूप देणाऱ्या या ग्रंथाच्या प्रकाशन पूर्व नोंदणीसाठी अविरत प्रकाशन जळगावच्या 9028868953 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रकाशक श्री जयंत कुलकर्णी यांच्या द्वारे करण्यात येत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News